Guardian Minister Districts  Sarkarnama
पुणे

Guardian Minister Districts : अजितदादा पुण्याचे कारभारी तर चंद्रकांतदादांकडे सोलापूर; 12 जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर !

Chetan Zadpe

Mumbai News : पालकमंत्रिपदाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. एकूण 12 जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची सुधारित यादी समोर आली आहे. यामध्ये अपेक्षेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आले आहे.

पुणे हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, पण राज्य सरकारमध्ये कालपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद होते. जे आज पुन्हा अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्रिपद राखले आहे. त्यामुळे अजित पवार हेच पुण्याचे कारभारी ठरले आहेत.

चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या या यादीत अजित पवार गटाचा दबदबा दिसून येतो. यामध्ये अजित पवार गटाच्या एकूण सात मंत्र्यांची वर्णी लागला आहे. तर अपेक्षेप्रमाणे बीडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे यांची निवड झाली आहे.

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

पुणे-अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे-पाटील

सोलापूर- चंद्रकांतदादा पाटील

अमरावती- चंद्रकांतदादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा - सुधीर मुनगंटीवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT