Tembhu Water Issue : ना राष्ट्रवादी ना भाजप, शिंदे गटानेच मारली बाजी; टेंभू पाणी योजनेला अखेर मंजुरी

Suman Patil Vs Anil Babar : आमदार अनिल बाबर यांनी आणले मंजुरी पत्र
Anil Babar, Eknath Shinde, Suman Patil, Sanjay Patil
Anil Babar, Eknath Shinde, Suman Patil, Sanjay PatilSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Sangli Political News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव तालुका आणि कवठेमहांकाळतील गाव दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. टेंभू पाणी योजनेवरून सांगली जिल्ह्यातील राजकारण पेटले असून, आमदार सुमन पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यात श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. या दोघांच्या लढाईत मात्र शिंदे गटाने बाजी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मंजुरीचे पत्र आमदार अनिल बाबर यांच्याकडे सोपवले आहे. त्यामुळे या दोघांच्या श्रेयवादाच्या लढाईत आमदार अनिल बाबर यांनी संधी साधून युद्ध जिंकले आहे. (Latest Political News)

तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 18 गावांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी योजनेच्या विस्तारित अहवालास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी आमदार सुमन पाटील (Suman Patil) व युवा नेते रोहित पाटील यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून ते उपोषण सुरू करणार होते. त्यापूर्वीच राज्य सरकारने या आंदोलनाची हवा काढून घेतली आहे.

Anil Babar, Eknath Shinde, Suman Patil, Sanjay Patil
Cabinet Expansion : गोगावले, शिरसाट, कडूंची आता तरी मंत्रिमंडळात वर्णी लागणार का ?

आमरण उपोषणाचा इशारा देताच शासकीय यंत्रणा सकाळपासूनच कामाला लागली. टेंभू योजनेवरून भाजपचे आमदार संजय पाटील आणि आमदार सुमन पाटील यांच्यातील श्रेयवादाचा राजकारणाचा फायदा शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी घेतला. विस्तारित टेंभू योजनेच्या आठ टीएमसी पाण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजुरीच बाबरांनी दिली आहे. (Maharashtra Political News)

दुष्काळी खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कल या तालुक्यातील वंचित गावांतील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार अनिल बाबर गेले. ते तीन ते चार वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. टेंभू विस्तारीत योजनेसाठी आठ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यास शासनाने सोमवारी अंतिम मंजुरी दिली आहे. याबाबत झालेल्या आदेशाची प्रत शासन निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अनिल बाबर यांना वर्षा निवासस्थानी दिली. या वेळी मुख्यमंत्री शिंदेंनी टेंभू योजनेच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) कॅबिनेटमध्ये आणून लवकरच मान्यता दिली जाईल, असे सांगितले.

...तोपर्यंत माघार नाही

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली असली तरी विस्तारित टेंभू योजनेच्या तृतीय सुधारित प्रशासकीय अहवालास मान्यता मिळावी, अशीही मागणी आहे. जोपर्यंत याला मान्यता मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, आमरण उपोषण सुरूच राहील,' अशी भूमिका आमदार सुमन पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतरही या टेंभू योजनेच्या पाण्याचा मुद्दा तापणार असल्याची राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Anil Babar, Eknath Shinde, Suman Patil, Sanjay Patil
BJP Political News : छत्तीसगड, राजस्थानमधील भाजपची यादी 'फायनल'; 'या' उमेदवारांना प्राधान्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com