Ajit Pawar
Ajit Pawar  
पुणे

Ajit Pawar news: अजित पवारांनी दिला सुखी संसाराचा कानमंत्र...

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar news : महिला घर सांभाळत असतात तेव्हाच पुरुषांना अशा प्रकारचे यश मिळते, त्यामुळे इतर घरातील महिलांनीही वागावं, तरच त्यांच्या घरातील पुरुष मंडळी अशी यशस्वी होतील, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुखी संसाराचा कानमंत्राची मिश्किल टिप्पणी केली. ते देवाच्या आळंदीत बोलत होते.

जुन्नर आंबेगावमधील जेष्ठ माजी शिक्षक के. के निकम सर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्या प्रसंगी अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना त्यांनी उपस्थित महिलांना उद्धेशून केलेल्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. के के सरांच्या पत्नी विद्याताई ह्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यामुळेच के. के. सर कर्तृत्व सिद्ध करू शकले हे सांगतानाच इतर महिलांनी देखील विद्याताईंचा आदर्श घ्यावा आणि नवऱ्याला सतत टोमने मारू नये, हे सांगतानाच महिलांची थोडी नक्कल केली. पण त्याच वेळी आपण महिलांबद्दल मी घसरलो नसल्याचेही स्पष्ट केलं.

'के. के. निकम सरांनी आपली सर्व हयात शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानासाठी घालवली. त्यांच्या हातून हजारो विद्यार्थी घडले. शेतीशी इमान राखून, प्रामाणिकपणे, सचोटीने समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम त्यांनी केले. ज्ञानदानाचे कार्य करताना निकम सरांच्या मागे त्यांचे कुटुंब ठामपणे उभे राहिले. निकम सरांनी केवळ ज्ञानदान केले नाही तर विविध प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून राबवले. ते प्रकल्प अभ्यासक्रमाबाहेरील आहेत. ते प्रकल्प पाहण्यासाठी सर्व पंचक्रोशीतून लोक येतात. असा त्यांचा लौकिक आहे. त्यांनी उत्तम शिक्षकाचा आदर्श समाजापुढे ठेवला.'' अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच, निकम सरांचे कार्य कायम दीपस्तंभाप्रमाणे येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करत राहील. निकम सर आणि त्यांच्या पत्नी या दोघांना दीर्घायुष्य लाभो, ही शुभकामना! अशा शुभेच्छाही त्यांना दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT