Deputy CM Ajit Pawar writes to Union Minister Nitin Gadkari requesting urgent road widening in Pune to resolve growing traffic congestion. Sarkarnama
पुणे

Pune Traffic : "फक्त 3 रस्ते नीट करा"; पुण्यातील ट्राफिकवर अजितदादांचा उपाय; थेट गडकरींना पत्र

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नाशिक फाटा ते खेड, हडपसर ते यवत आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी अजित पवार यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

Sudesh Mitkar

Pune Traffic News : पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. पुण्याच्या परिसरातील 3 राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी अजित पवार यांनी या पत्रातून केली आहे.

अजित पवार यांनी नितीन गडकरींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता 3 राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे. नाशिक फाटा ते खेड हा सध्या 4 लेन असलेला मार्ग 6 लेनमध्ये रुपांतर करावा. हडपसर ते यवत हा मार्ग सध्या 4 लेनचा असून त्याचेही रूपांतर 6 लेनमध्ये करण्यात यावे. तसेच तळेगाव–चाकण–शिक्रापूर हा रस्ता सध्या 2 लेनचा असून तो महामार्ग 4 लेन करण्याची आवश्यकता आहे.

या तिन्ही मार्गांवर शिक्षण संस्था, औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालये, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. रस्त्यांवर सतत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहनचालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत. या मार्गाच्या क्षमतेपेक्षा काही पटीने अधिक वाहन सध्या या मार्गावरून प्रवास करत आहे .

यामुळे या महामार्गावर तात्काळ लेन वाढवण्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे. यातून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठी देखील पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल. हे तिन्ही महामार्ग पुणे शहराच्या प्रवेशद्वारांशी जोडले गेलेले असल्यामुळे, पुणे जिल्ह्याच्या बाहेरील भागातील मोठ्या प्रमाणावर वाहने शहरात प्रवेश करतात त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे या मार्गांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील रुंदीकरणाच्या कामास सध्या चालू असलेल्या एलिव्हेटेड हायवे निविदेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तात्पुरता पर्याय म्हणूनही उपयोग होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवून देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT