Manikrao Kokate and Ajit Pawar
Manikrao Kokate and Ajit PawarSarkarnama

Manikrao Kokate News : अजितदादांकडून कृषीमंत्र्यांची 'शाळा' : झाप झाप झापलं... कोकाटे शांतपणे फक्त ऐकत होते!

Maharashtra Agriculture Minister: अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (मंगळवार) भेट झाली. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अजितदादांच्या अँटीचेंबरमध्ये दोघांमध्येही एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली.
Published on

Manikrao Kokate News : अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (मंगळवार) भेट झाली. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अजितदादांच्या अँटीचेंबरमध्ये दोघांमध्येही एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. या बैठकीनंतर अजित पवार कोकाटे यांचा राजीनामा घेणार का? की त्यांचे खाते बदलणार? की केवळ समज देऊन सोडून देणार या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार - कोकाटे यांच्यामध्ये काय चर्चा झाली?

या चर्चेचा सविस्तर तपशील समजू शकला नसला तरी कोकाटेंना अत्यंत कडक शब्दात समज दिली असावी, असे सांगितले जाते. साम वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, कितीवेळा चुकणार? कितीवेळा माफ करायचं? असा सवाल कोकाटे यांना केला. आम्ही तुम्हाला खूप सांभाळून घेतलं. पण आता विषय पुढे गेला आहे. तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे, अशा शब्दात अजितदादांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, आजच नाशिकमधील कोकाटे समर्थकांचे शिष्टमंडळ अजित पवार यांच्या भेटीसाठी आले होते. या भेटीत कोकटे यांचा राजीनामा घेऊ नये, अशी विनंती करण्यात आली. यावर राजीनामा घेऊ नये म्हणून भेटीसाठी आला आहात, मंत्रिपद दिले तेव्हा आला होता का? असा सवाल विचारण्यात आला. तसेच हा विषय आता माझ्या हातात नाही, असेही सांगितले असल्याचे समजते.

Manikrao Kokate and Ajit Pawar
Manikrao Kokate : राजीनाम्याचा फैसला जवळ येताच कोकाटेंना उपरती, चूक मान्य करत दिला 'हा' शब्द

अजित पवार यांनी या बैठकीदरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्री कॅबिनेट बैठकीसाठी आलेल्या काही वरिष्ठ मंत्र्यांसोबत चर्चा केल्याचे सांगितले जाते. यावेळी कोकाटे हे ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांना समज द्या, कारवाई नको. फार तर खाते बदला असा सल्ला देण्यात आला. त्यामुळे या बैठकीनंतर आता अजित पवार यांच्या निर्णयाकडे नाशिक जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com