Ajit Pawar News  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News: दिवंगत अजित पवारांना पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Pune University lifetime achievement award Ajit Pawar: पुणेविद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रामधील योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी ही माहिती दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७७ वा वर्धापनदिन मंगळवार (१० फेब्रुवारी) सकाळी १०.३० वाजता इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात होत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे या समारंभाचे प्रमुख अतिथी आहेत. यावेळी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, हे या समारंभाचे अध्यक्ष आहेत.

विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अतिशय प्रतिष्ठेच्या अशा या पुरस्कारासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, सहकार, पर्यावरण, कला इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

यंदा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील योगदानाबद्दल अजितदादा पवार,उद्योग क्षेत्रामधील योगदानाबद्दल पद्मश्री डॉ.अशोक खाडे, सहकार क्षेत्रामधील योगदानाबद्दल अप्पासाहेब दादाबा राजळे , शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. डॉ. पंडित विद्यासागर आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती शमा भाटे यांना यावर्षीचा जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT