Eknath Khadse News: एकनाथ खडसेंना कोर्टाचा दणका; आधी दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला, आता थेट अजामीनपात्र वॉरंट

MPMLA Court Issues Non-Bailable Warrant Against Eknath Khadse:सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे खडसेंवरील आरोप निश्चितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने खडसे दाम्पत्याला मोठा दणका दिला आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणात ही कारवाई करण्यात येणार आहे.

याप्रकरणी काल (शुक्रवारी) कोर्टात आरोप निश्चिती होणार होती, पण खडसे दाम्पत्य कोर्टात गैरहजर होते. त्यामुळे विशेष एमपीएमएलए कोर्टाने त्यांना नॉन बेलेबल वॉरंट बजावला आहे.

16 जानेवारी रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एमपीएमएलए न्यायालय हे काही कारणानं उपलब्ध नसल्यामुळं या प्रकरणाची सुनावणी काल (6 फेब्रुवारी) होणार होती. 3 डिसेंबर 2025 रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयानं भोसरी येथील जमीन विक्रीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यात खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. त्यानंतर विशेष न्यायालयात शुक्रवारी आरोप निश्चित होणार होते.

Eknath Khadse
Ajit Pawar Death: मोठी बातमी: अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल; तांत्रिक बिघाड की लँडिंगचा अँगलच चुकला?

सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे खडसेंवरील आरोप निश्चितीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला होणार आहे.

  • पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल झाले आहे.

  • या सुमारे एक हजार पानांच्या आरोपपत्रात खडसे पती-पत्नी आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही समावेश आहे.

  • या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज नुकताच फेटाळण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com