Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Baramati NCP Politics : बारामतीत राजकारणाचा नवा अंक; अजितदादांच्या नव्या-जुन्या शिलेदारांत वाद, काय आहे कारण?

Ajit Pawar, Sunetra Pawar : आगामी निवडणुकांत एकदिलाने काम करू, अजितदादांना तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : आगामी लोकसभेसह विधानसभेची सर्व कामे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथूनच पाहतील, असा आग्रह बारामती शहराध्यक्ष जय पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. दरम्यान, आजपर्यंत झालेल्या निवडणुकांची कामे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी, माजी नगरसेवक किरण गुजर पाहत आले आहेत. आता मात्र त्यांच्या हातातील सर्व सूत्रे नवे पदाधिकारी आपल्या हातात घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यातूनच बारामतीत अजितदादांचे नवे विरुद्ध जुने शिलेदार असा वाद सुरू झाल्याची चर्चा आहे.

किरण गुजर (Kiran Gujar) यांनी नटराज संस्थेच्या माध्यमातून बारामती परिसरात सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळ उभी केली. मात्र, त्यांच्याकडे पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीचे कुठलेही पद नाही. पवार कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे असल्याने गुजर आतापर्यंत निवडणुकीची सर्व कामे पाहत होते. आता मात्र लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांवरील जबाबदारी वाढणार आहे. यातूनच शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आणि सचिन सातव यांनी निवडणुकीची सर्व कामे राष्ट्रवादी भवन आणि शहर कार्यालयातून होतील, अशी भूमिका घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, नटराजबाबत संस्थान असा उल्लेख केल्याने गुजर नाराज झाले होते. 'नटराजची तुलना कुठल्याही पक्षाशी करू नये. किरण गुजर यांना नटराजचे संस्थान म्हणणे हीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मोठी घोडचूक आहे. पूर्वीपासून राजकारण आणि कला, शिक्षण व सांस्कृतिक यात अंतर ठेवूनच काम केलेले आहे. आता कुणी आपल्या स्वार्थासाठी नटराजला संस्थान म्हणून टीका टिप्पणी करत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही,' असा इशाराच गुजर यांनी दिलेला आहे.

मतभेद नाहीत, एकदिलाने काम करू

बारामतीत कुठल्याही प्रकारची गटबाजी नसल्याचे शहराध्यक्ष जय पाटील (Jay Patil) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, 'सध्या निवडणुकीचा काळ असल्याने चुकीची माहिती पसरवली जात आहे. यापूर्वी निवडणुकांतील प्रशासकीय कामे किरणदादा पाहत होते, तर लोकांमध्ये मिसळून आम्ही काम करत होतो. वरिष्ठ या नात्याने वेळ पडेल तेव्हा त्यांचे मार्गदर्शन लाभते. आताही अजितदादा (Ajit Pawar) ज्यांना काम पाहायला सांगतील, तेच काम करतील. आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही. आम्ही आगामी निवडणुकांत एकदिलाने काम करणार असून, अजितदादांना तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही, असा दावाही शहराध्यक्ष जय पाटलांनी केला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT