Baramati Politics : बारामती राष्ट्रवादीत अजितदादांजवळ जाण्यासाठी स्पर्धा; अंतर्गत कुरघोडी वाढल्या ?

Kiran Gujar and NCP : माजी नगरसेवक किरण गुजर यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न सुरू?
Kiran Gujar
Kiran GujarSarkarnama
Published on
Updated on

Baramati NCP Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर बारामतीतील अजित पवार गटातील पदाधिकारीही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यातून अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक किरण गुजर यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

आता बदललेल्या राजकीय स्थितीत अजितदादांजवळ जाण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांत स्पर्धा वाढल्याचे दिसत असल्याचा आरोप होत आहे. यातूनच अजितदादांच्या पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोप सुरू असून पक्षांतर्गत वाद समोर येत आहे. दरम्यान, काही पदाधिकाऱ्यांनी केलेली विधाने आणि घेतलेल्या भूमिकांमुळे किरण गुजर उद्विग्न झाले आहेत.

Kiran Gujar
Balasaheb Thorat : देवरा, सिद्दीकींचा विषय बाळासाहेब थोरातांनी एका वाक्यातच संपवला; म्हणाले...

बारामती आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे समिकरण संपूर्ण देशाला माहिती आहे. या समिकरणात आता खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव घेतले जाते. या सर्वांचे स्थानिक सूत्रे माजी नगरसेवक किरण गुजर सांभाळत आले आहेत.

शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या आणि अजित पवारांच्या निवडणुकीची सर्व कामे गुजर पाहतात. आजपर्यंत ही कामे चोखपणे पार पाडल्यानेच स्थानिक राजकारणात गुजरांच्या शब्दाला मान आहे. आता मात्र नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांनी गुजरांना थेट चॅलेंज देणे सुरू केल्याची माहिती आहे.

Kiran Gujar
Ajit Pawar NCP : निवडणुकीचं वर्ष, अजित पवारांची तयारी जोमात; मोठ्या कार्यक्रमाची घोषणा

बारामतीतील बदलेल्या सूरामुळे गुजर उद्विग्न झाले आहेत. यातूनच त्यांनी, स्वाभिमान सोडणार नाही, असे म्हणत या गटातटाच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली. बारामतीतील पक्षांतर्गत गटबाजी पाहून उपमुख्यमंत्री पवारही चिडलेले दिसले. दरम्यान, पक्षात फूट पडल्यानंतर बारामतीकरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यावर बोट ठेवत अजित पवारांनी (Ajit Pawar) मनातून सगळे विचार काढून टाका आणि माझ्याच मागे उभे राहा, असे बारामतीकरांना आवाहन करत दोलायमान असलेल्या पदाधिकाऱ्यांना सूचक इशाराही दिला.

Kiran Gujar
Abhishek Ghosalkar Case : एकाच पक्षातील वादाला सरकार कसे जबाबदार?

कोण आहेत किरण गुजर?

बारामतीच्या शैक्षणीक आणि सांस्कृतिक क्षेत्रात रमणारे किरण गुजर पवार कुटुंबियांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. ते त्यांच्या तरुणपणापासून पवारांसोबत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांची राजकीय कारकीर्द बहरताना त्यांनी पाहिली आहे. बारामतीची विधानसभा असो वा लोकसभा, त्यांनी निवडणुकीचे सर्व कामकाज चोखपणे पार पाडलेले आहे. ते विविध निवडणुकांत शहरासह ग्रामीण भागात रणनीती आखण्यात माहीर आहेत. एकंदरीत किरण गुजर यांना बारामतीचे राजकीय चाणक्य म्हणूनच ओळखले जाते.

गुजर काय म्हणतात ?

आजपर्यंत निष्ठेने जाबाबदाऱ्या पार पाडूनही नवीन पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अवहेलनेमुळे गुजर चांगलेच नाराज असल्याचे दिसले. ते म्हणाले, 'मी 40 वर्षे अजितदादांसोबत आहे. बारामतीत कधीही गटबाजीचं राजकारण नव्हतं. आता बदलेल्या राजकीय स्थितीचा काही पदाधिकारी गैरफायदा घेत आहेत. यातून ते स्वतःच्या फायद्यासाठी निष्ठावानांना त्रास देतात. संस्थान म्हणत नाटराज संस्थेसह मला हिणवले जात आहे. हा प्रकार गटबाजीतून होत असून ते सहन करणार नाही. त्याला अजितदादांनी आवर घालावा, अशीच अपेक्षा आहे. याचा अर्थ मी अजित पवारांवर नाराज होतो, असा होत नाही. पक्षांतर्गत गटबाजीचा मला त्रास होतोय, असे स्पष्ट मत किरण गुजर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले.

Kiran Gujar
Abhishek Ghosalkar Case : मुंबई सुटलेल्या गोळीतून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com