Pune Politics : राज्याच्या विकासाठी आपल्याला सत्ता हवी आहे. महाविकास आघाडीतील नेते फक्त गप्पा मारतात. विकासासाठी निधी लागतो आणि महायुती मोठ्या प्रमाणात राज्याला निधी मिळवून देईल.
त्यासाठी मते मागायला गेल्यावर लोकांना सांगा की अजित पवार कधीही जातीपातीचे, भेदभावाचे राजकारण करत नाही, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. ते पिंपरी चिंडवड येथील मेळाव्यात बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अजित पवारांचे कधीही जातीपातीचे राजकारण करत नाहीत, असे म्हणत गौरवोद्गार काढले होते. त्यानंतर अजित पवारांनीही तोच मुद्दा अनेक स्टेजवर बोलून दाखवला होता. मात्र लोकसभेत त्यांना फटका बसला. आता विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी महायुतीतील नेते अनेक मुद्द्यांवर विरोधकांवर पलटवार करताना दिसत आहेत.
अजित पवार Ajit Pawar म्हणाले, आपल्याला पुन्हा युतीचे सरकार आणायचे आहे. विरोधक निधी आणू शकत नाही, फक्त गप्पा मारतात. कुणी कुठेही जाऊ द्या, तर तळ्यात मळ्यात असणाऱ्यांना समाजावून सांगा. विधानसभा प्रचारावेळी सर्वांना ठासून सांगा, की अजित पवारांनी जाती-पातीचे आणि भेदभावाचे राजकारण केलेले नाही, असे आवाहन पवारांनी केले.
या निवडणुकीत अजित पवार गटाने जोरदार तयारी केलेली आहे. 'इमेज बिल्डिंग'चे काम एका मोठ्या संस्थेला दिले आहे. त्यानुसार अजित पवारांनी बदल करण्यास सुरूवात केल्याचीही सुरुवात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गुलाबी जॅकेट. त्यावर अजित पवार म्हणाले, कार्यकर्ते, समर्थक म्हणतात की जॅकेट चांगले दिसते. लोकांनाही ते आवडत असल्याने फोटो काढतात. त्यामुळे मीही तेच जॅकेट घालतो.
आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या प्रत्येक मुलीला शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. सरकार त्यांचा खर्च करणार आहे. तरी विरोधक म्हणतात अजित पवारांनी कसा हा अर्थसंकल्प आणला. अरे यापेक्षा चांगला अर्थसंकल्प कसा मांडणार?, असा उलट प्रश्नच अजितदादांनी विरोधकांना केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.