Devendra Fadnavis News : फेक नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र

Bjp Political News : पुण्यात प्रदेश भाजपचे अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार, खासदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विरोधकांकडून सातत्याने खोटा नरेटीव्ह पसरवून सरकारवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. येत्या काळात विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला बळी न पडता त्यांना थेट उत्तर देण्यासाठी तुम्हाला खोटं बोलायचंच नाही तर खरे बोलायचे आहे. खरे बोलायला जास्त विचार करावा लागत नाही. त्यांना खोटं बोलण्यासाठी जास्त विचार करावा लागणार आहे. तुम्हाला खरं बोलायचे आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीने मैदानात उतरले पाहिजे, असा कानमंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पुण्यात प्रदेश भाजपचे (Bjp)अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आमदार, खासदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. (Devendra Fadnavis News)

विरोधकांकडून सातत्याने खोटा नरेटीव्ह पसरवून सरकारवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. येत्या काळात विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला बळी न पडता त्यांना येत्या काळात थेट उत्तर देण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, कार्यकर्त्यांसह नेत्यांनीदेखील सुद्धा सोशल मीडियातून सक्रिय होण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ 0.3 टक्के मते कमी मिळाल्याने झाला आहे. महायुतीला 43.6 टक्के मते पडली तर महाविकास आघाडीला 43.9 टक्के मते मिळाली. आपल्या 17 जागा आल्या तर त्याच्या 31 जागा कमी आल्या. त्यासाठी येत्या काळात थोडी मेहनत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadanvis
Supriya Sule's Big Statement : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या...

लोकसभा निवडणुकीवेळी फेक नरेटिव्हला सेट करण्यात आला होता. त्याला आपण इफेक्टिव्ह नरेटिव्हने उत्तर देऊ शकलो नाही. त्यामुळे आपण निवडणुकीत काहीसे मागे पडलो. देशात आरक्षणाला एक सीमा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणासाठी कालावधी दिला होता. हा कालवधी संपल्यानंतर पहिल्यांदा अटलबिहारी वाजपेयी व त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाची सीमा वाढवून मुदतवाढ दिली. त्यामुळेच आपल्या संविधानाने दिलेलं आरक्षण आजही सर्वसामान्यांना मिळत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विरोधकांनी एक खोटा नरेटिव्ह सेट केला होता. हे निवडून आले तर संविधान बदलतील असा खोटा प्रचार करण्यात आला. पण हे लक्षात ठेवा जे खोटे असते त्याचे वय मोठे नसते. जे खरे असते त्याचे वय मोठे असते. त्यामुळे विरोधकांनी मिळवलेला हा विजय फुग्यासारखा आहे. केवळ टाचणी लावली की हा फुगा फुटू शकतो. विधानसभा निवडणुकीत त्याची सुरवात केली आहे. टाचणी लावली अन फुगा फुटला असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadanvis
Assembly Election 2024 : मोठी बातमी! भाजप 'एवढ्या' जागा लढण्याच्या तयारीत, शिंदे अन् अजितदादांचं काय?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com