Ajit pawar Sarkarnama
पुणे

Video Ajit Pawar : शिंदेंच्या आमदारावर अजितदादा भडकले, म्हणाले, नवीन प्रश्न...

Ajit pawar on Eknath Shinde's : शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानावरून अजित पवार यांनी त्या आमदारांना चांगलच सुनावलं आहे.

Sudesh Mitkar

Pune News : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गांधी यांच्या विरोधात विविध ठिकाणी निषेध आंदोलन देखील करण्यात येत आहे. त्याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानावरून अजित पवार यांनी संजय गायकवाड यांना चांगलच सुनावलं आहे.

दगडूशेठ गणपतीची आरती केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गणपती बाप्पाचा आम्हाला आशीर्वाद असून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यातील येणार असं विधान केलं आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना जे वाटलं ते मुख्यमंत्री बोलले पण माझं स्पष्ट मत आहे. राज्यातील जनतेच्या मनात जो असेल त्याचं सरकार येत असतं. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत तर विरोधक त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत.

आम्ही महायुती सरकारच्या काळात चांगल्या योजना दिल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आता केंद्रामध्ये सलग तिसऱ्यांदा एनडीएच सरकार आलं आहे. या सरकारकडून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी आणण्याचं काम आम्ही करत आहोत. त्याची सुरवात वाढवण बंदराच्या कामाने झाली असून काल देखील वंदे भारत ट्रेन महाराष्ट्राला मिळाली. केंद्र सरकार महाराष्ट्रातील (Maharashtra) विकास कामासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत.

नुकतेच कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारकडे आम्ही मागणी केली होती ती मागणी तातडीने मान्य करण्यात आली आहे. याखेरीज सरकारकडे शेतकऱ्यांच्या संदर्भातील सहा मागण्या आम्ही केंद्र सरकारला केल्या आहेत. त्यावर देखील लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे.

पुण्यातील विसर्जन मिरवणूक वेळेत संपवाव्यात यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदा देखील चार वाजता गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी देखील त्यांनी अशाच प्रकारचं नियोजन केलं होतं. ज्या त्या दिवशीच गणेश विसर्जन झालं तर पोलीस प्रशासनासह नागरिकांनाही ते सोपं जातं. 36 तास जर मिरवणुका चालल्या तर त्याबाबतचे नियोजन करण्यास पोलिसांना देखील समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून नियमाने अटीचे पालन करणे आवश्यक आहे.

आमदार गायकवाड यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्या सहित कोणीच वेडी वाकडी वक्तव्य करू नये. महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण यांनी जी शिकवण आपल्याला दिली आहे. त्या शिकवणीतूनच पुढे जाणं आवश्यक आहे. दोन गटांमध्ये तणाव निर्माण होईल अशी वक्तव्य करणं चुकीचं असून यातून वातावरण गढूळ होतं आणि नवीन प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये गोष्टीला माझा विरोध असून मी त्या गोष्टीचा निषेध करतो, असं अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT