chandrakant patil
chandrakant patil sarkarnama

Chandrakant Patil : पुण्यात चाललंय काय? मद्य पिऊन तर्रर्र झालेल्या तरूणांच्या कारची चंद्रकांतदादांच्या ताफ्यातील गाडीला धडक अन्...

Chandrakant Patil : सोमवारी रात्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा एका मद्यपी चालकानं जोरदार धडक दिली. मात्र...
Published on

पुण्यात सातत्यानं अपघाताच्या घटना घडत असतात. रस्त्यावर चालणारी जनताच सुरक्षित नाही आहे. आता मात्र सुरक्षेच्या गरड्यात असलेले मंत्रीही त्यातून सुटले नाहीत. एका मद्यपी चालकानं मंत्र्याच्याच गाडीला धडक दिल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यानं जोरदार धडक दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. चंद्रकांतदादा पाटील ( Chandrakant Patil ) यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला मद्य पिऊन कार चालवणाऱ्यानं धडक दिली. या घटनेत पोलिसांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. मात्र, चंद्रकांतदादा पाटील थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मात्र, मद्यपी चालकानं ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला धडक दिल्यानं चंद्रकांतदादा पाटील चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

chandrakant patil
Maratha Reservation : राजेंद्र राऊतांच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीवर चंद्रकांतदादांनी दिली महत्वाची माहिती...

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "मद्यपी चालकाच्या कारनं माझ्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला धडक दिली. या कारमधील तरूण आणि तरूणी मद्य पिऊन तर्रर्र होते. अपघानंतर तरूणांना पकडण्यात आलं. तर तरूणी पळून गेल्या होत्या. माझी कार पुढे गेली अन्यथा मी तुमच्यासमोर दिसलो नसतो. याला गृहमंत्री कसे जबाबदारी असतील? का गृहमंत्र्यांनी तिथे उभारले पाहिजे?"

chandrakant patil
Maratha Reservation : राजेंद्र राऊतांच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीवर चंद्रकांतदादांनी दिली महत्वाची माहिती...

"अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी तरूणींना ताब्यात घेतलं आहे. आता पोलिसांनी गडबड केली, तर चुकीचं आहे. गृहमंत्र्यांनी 'अ‍ॅक्शन' घेतली पाहिजे. त्या मद्यपी तरूण आणि तरूणींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पुण्यात चाललंय काय?" असा सवाल चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com