ajit pawar.jpg sarkarnama
पुणे

Video Ajit Pawar : स्टेज, बॅनर्स, पोस्टर अन् 'जॅकेट'ही गुलाबी, 'पिंक पॉलिटिक्स'वर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माझ्या...

Ajit Pawar On Pink Politics : लोकसभेला झालेल्या पराभवानंतर आगामी विधानसभेसाठी अजितदादा गटानं रणनीती बनवण्यास सुरूवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजितदादांचे 'पिंक पॉलिटिक्स' पाहायला मिळत आहे.

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं चार उमेदवार उभे केले होते. पण, रायगडचे उमेदवार सुनील तटकरे वगळता तीन ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीला अपयश आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

आगामी विधानसभेसाठी अजितदादा ( Ajit Pawar ) गटानं रणनीती बनवण्यास सुरूवात केली आहे. त्याचा भाग म्हणून पक्षाच्या कार्यक्रमातील स्टेज, बॅनर्स, पोस्टर आणि जाहिरातींवर अधिकाधिक गुलाबी रंगाचा वापर करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे अजितदादा सुद्धा गुलाबी रंगाच्या जॅकेटचा वापर करत आहेत. त्यामुळे विधानसभेला अजितदादांचे 'पिंक पॉलिटिक्स' पाहायला मिळत आहे. या 'पिंक पॉलिटिक्स'वर अजितदादांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि तुम्ही जॅकेट सुद्धा गुलाबी रंगाचे वापरत आहात? याबद्दल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं प्रश्न विचारल्यावर अजितदादा म्हणाले, "तुला काही त्रास होतोय का? मला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मी कोणते कपडे घालायचे, तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशानं घालतो. तुमच्या कुणाच्या पैशानं घालत नाही. जो सर्वसामान्य माणूस घालतो, त्याच पद्धतीनं मीही पेहराव करतो. माझ्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटते ते करतो."

महायुतीमधून बाहेर पडत विधानसभेला तिसरी आघाडी करणार का? या प्रश्नावर अजितदादांनी म्हटलं, "अशा बातम्या मी सुद्धा ऐकत असतो. माझी सुद्धा करमणूक होत असते. एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT