NCP NEWS : विधानसभा निवडणुकीपूर्वी दादा अन्‌ साहेब एकत्र येऊ शकतात; राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे विधान

Atul Benke' Statement : काही दिवसांपासून अजित पवार गटातील नेते ही शरद पवार यांना भेटत आहेत. यापूर्वी राज्याचे मंत्री छगन भुजबळ, त्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आता अतुल बेनके यांनी पवारांची भेट घेतली आहे, त्यामुळे हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
Ajit Pawar-Atul Benke-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 20 July : विधानसभा निवडणुकीला आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काहीही घडू शकतं. यदा कदचित दादा (अजित पवार) आणि साहेब (शरद पवार) एकत्र येऊ शकतात, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केले आहे.

आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार बेनके यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. कारण काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेते ही शरद पवार यांना भेटत आहेत. यापूर्वी राज्याचे मंत्री छगन भुजबळ, त्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आता अतुल बेनके यांनी पवारांची भेट घेतली आहे, त्यामुळे हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बेनके म्हणाले, विधानसभा निवडणुकीला अजून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काहीही घडू शकतं. त्यावर आता भाष्य करण्यात काही अर्थ आहे का. यदाकदाचित आम्ही महायुती म्हणून पुढे जात आहोत, पण जागा वाटपावरून काहीही होऊ शकतं. यदा कदचित दादा आणि साहेब (शरद पवार) एकत्र येऊ शकतात. मी एक छोटा घटक आहे. राज्यातील 288 आमदारांपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे राजकारणात पुढे जात असताना पुढे काय घडेल, हे मी आता कसं सांगू शकतो.

शरद पवार यांच्या भेटीवर बेनके म्हणाले, आमच्यामध्ये पावसासंदर्भात चर्चा झाली. पाऊस अजूनही बऱ्यापैकी झालेला नाही. मध्यंतरी पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. धरणात अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. गुळुंचवाडीत झालेल्या अपघातप्रकरणी चर्चा झाली. त्यावर काय उपाय योजना करायच्या, त्यावर मी आणि खासदार अमोल कोल्हे यांंनी चर्चा करून त्याबाबत पवारांना माहिती दिली, अशी माहिती दिली.

Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
Mohite patil meet Rajan Patil : लोकसभेपूर्वी भेटलेले विजयदादा पुन्हा अनगरच्या पाटलांच्या वाड्यावर; दोन्ही नेत्यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

खासदार अमोल कोल्हे यांनी गाईंचा गोठा केला आहे. त्याबाबत चर्चा करण्यात आली. त्या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नाही. राजकीय चर्चा तर अजिबात झाली नाही, असेही बेनके यांनी स्पष्ट केले.

बेनके म्हणाले, माझी आणि खासदार अमोल कोल्हे यांची चांगली मैत्री आहे. आम्ही मित्रच आहोत आणि मित्रच राहणार आहोत. या मैत्रीमध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.

Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
BJP Core Committee Meeting : शिंदे अन् अजितदादांना सोबत घेऊन की स्वबळावर लढणार? भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com