Ajit Pawar and Dr. Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News: 'आधी पार्थ पवारला निवडून आणा, मग कोल्हेंना पाडण्याच्या बाता करा!'

Ncp spokesperson Lawande challenges Ajit Pawar: शरद पवार गटाचे प्रवक्ते लवांडे यांचे अजित पवारांना आव्हान

Sudesh Mitkar

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करत शिरुर लोकसभा मतदारसंघातून मी दिलेला उमेदवार निवडून आणून दाखवणारच, असे थेट आव्हान दिले. त्यानंतर अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्याच दिवशी भेट दिली. यावेळी या भागातील रखडलेल्या विकास कामांची पाहणी देखील केली. त्यावेळी 'मी सांगितलं तेच फायनल, विषय संपला', असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री पवारांच्या इशाऱ्यानंतर खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तातडीने भेट घेतली. या भेटीनंतर खासदार कोल्हेंनीही अजित पवारांना सूचक इशारा देत खासगीतील कोणतीही चर्चा सार्वजनिक करणार नाही. मात्र, 'बात निकली हे तो दूर तक जाएगी...', मी 2019 साली जिथे होतो तिथेच आहे, ज्यांनी भूमिका बदलली त्यांना विचारा, अशा शब्दात खासदार कोल्हेंनी अजित पवारांना सूचक इशारा देखील दिलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता या वादाचा रोज नवीन अंक पहिला मिळत आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहे. याच वादात आता शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट अजित पवारांना चॅलेंज दिले आहे. शेतकरी आक्रोश मोर्चा दरम्यान ते बोलत होते. लवांडे म्हणाले, 'अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजून तुमचा उमेदवार फिक्स झाला नाही.

अजितदादा तुम्ही म्हणालात ना दिलीप वळसे पाटील यांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे विजयी झाले तर आता तुम्ही दिलीप वळसे पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे करा, मग आपण पाहूच काय होतंय. असेल हिम्मत तर लढाच'.

इतकंच नाही, तर अजित पवारांनी पार्थ पवार (Parth Pawar) यांना पुन्हा मावळ मध्ये उभे करावे आणि यावेळेस तरी निवडून आणून दाखवावे, मग बाकीच्या गप्पा मराव्यात, असे थेट ओपन चॅलेंज लवांडे यांनी अजित पवारांना दिले आहे. तुमचा दिल्लीत खूप वट आहे तर कांद्याचा प्रश्न सोडवून दाखवा, मल्ल साक्षी मलिक हिच्या डोळ्यातील अश्रू पुसायला महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या रुपाली चाकणकर यांना पाठवा ना, असं म्हणत लवांडे यांनी अजित पवारांना चांगलंच फैलावर घेतलं. त्यामुळे आता पुण्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात संघर्ष आणखीच टोकाला जाणार असल्याचे चित्र आहे.

(Edited By - Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT