Bachchu Kadu News : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू नेहमीच चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आमदार कडूही त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी अधूनमधून नाराजीही व्यक्त केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भेट झाल्यामुळे आमदार कडू हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आग्रह होता आणि एकनाथ शिंदे मला त्यांच्याकडे घेऊन गेले, त्यांना गरज होती म्हणून आपण महाविकास आघाडीत सरकारमध्ये सहभागी झालो होतो, असे त्यांनी गेल्यावर्षी स्पष्ट केले होते.
महाविकास आघाडी सरकारमधून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यामागचे कारणही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. दिव्यांगांच्या कल्याणासाठी, घरकुलांसाठी, मतदारसंघातील कामांसाठी मी शिंदे यांच्यासोबत गेलो. लोक त्याला गद्दारी म्हणत असतील तर मी त्याचे स्वागत करतो, असे आमदार बच्चू कडू म्हणाले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. तरीही कामे होत नव्हती, असे त्यांचे म्हणणे होते.
राज्यात दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने 9 जानेवारी 2023 रोजी केली. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला. पण पुढे काय झाले? आमदार बच्चू कडू यांना हवे तसे काम झाले का, ते ज्यासाठी महायुतीमध्ये सहभागी झाले, ती कामे पूर्ण झाली का? अर्थातच याची उत्तरे संमिश्र मिळतील, विकासकामांसाठी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना निधी मिळाला असेल, मात्र दिव्यांग मंत्रालयाचे कामकाज अद्यापही रूळावर आल्याचे दिसत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या मंत्रालयामुळे दिव्यांगाच्या स्थितीत सुधारणा झाली का, हा संशोधनाचा विषय ठरेल. दिव्यांगांना दरमहा जे मानधन मिळते, ते अनेक ठिकाणी अद्याप मिळालेले नाही. यासाठी असलेल्या तालुकास्तरीय समित्यांची बैठक अनेक महिने झालेली नव्हती. या बैठका होऊन दिव्यांगांना दरमहा मिळणारे तुटपुंजे वेतन, मानधन सुरू झालेले नाही, अशा तक्रारी आहेत.
दिव्यांगांनाही समान संधी मिळावी, यासाठी विशेष कृती आराखडा 1981 मध्ये तयार करण्यात आला होता. ते वर्ष अपंग वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते. 1981 पासून आतापर्यंत दिव्यांगाचे पुनवर्सन झाले आहे का, याचे उत्तर अर्थातच नाही असे असेल. दिव्यांगांच्या समस्यांचे सातत्याने भांडवल करण्यात आले.
आमदार बच्चू कडूही तसेच तर करत नसतील ना किंवा ते महायुतीच्या ट्रॅपमध्ये तरी अडकले असावेत का? असे प्रश्न निर्माण होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) आणि बच्चू कडू यांची 28 डिसेंबर रोजी झालेली भेट राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. शेतीच्या समस्यांविषयी चर्चा झाली, एकनाथ शिंदे असेपर्यंत महायुतीतून बाहेर पडणार नाही, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट आहे.
राजकारणातीलच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ता लागणे कठीण असते, असे बच्चू कडू गेल्यावर्षी त्या मुलाखतीत म्हणाले होते. त्यामुळे शरद पवारांच्या भेटीबाबत ते काहीही म्हणत असले तरी ती भेट राजकीयच होती हे नाकारता येत नाही. मध्यंतरी बच्चू कडू यांचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा दांपत्याशी मतभेद झाले होते. वाद विकोपाला गेला होता. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन मोठी रक्कम घेतली, असा आरोप आमदार राणा यांनी जाहीरपणे केला होता.
आमदार राणा यांचा हा आरोप 50 खोके एकदम ओके या घोषणेचे बळी ठरलेल्या बच्चू कडू यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार होता. दरम्यान, बच्चू कडू यांनी खासदार राणा यांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. गेल्या निवडणुकीत खासदार राणा यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. त्यामुळे शरद पवार यांच्याशी भेटीमुळे बच्चू कडू आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.