Ajit Pawar plane crash update Sarkarnama
पुणे

Ajit Pawar plane crash update : विमान अपघाताचा तपास तीन 'अँगल'ने; सगळंच समोर येणार...

CID investigation on Plane Crash: तपासातील निष्कर्षानंतर सीआयडी योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करून, त्याचा पुढील तपास करून न्यायालयात खटला दाखल केला जाईल.

Rajanand More

Maharashtra CID press briefing : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) करत असून अपघातानंतर तब्बल ३० दिवसांनी पहिल्यांदाच तपासाबाबत माहिती देण्यात आली. सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी अनेक पुरावे समोर आल्याचे सांगितले.

राज्य सरकारने विमान दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे देण्यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहितीही रामानंद यांनी दिली. ते म्हणाले, विमान दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि विमानात असलेले अजित पवार आणि इतर व्यक्तींच्या आकस्मिक मृत्यूचा तपास सीआयडीकडे तात्काळ वर्ग केला आहे. पुणे आणि नवी मुंबई गुन्हे अन्वेषण पथकाकडून हा तपास केला जात आहे.

आकस्मिक मृत्यूमागे घातपात आहे का, गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का आणि यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडले का, हे या तपासाचे तीन मुख्य उद्देश असल्याचे रामानंद यांनी सांगितले. तपास योग्य दिशेने आणि पहिल्या क्षणापासून सुरू आहे. यामध्ये आपल्याला बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील फॉरेन्सिक लॅब, एव्हिएशन प्राधिकरण आणि इतर संस्था, केंद्रातील अनेक संस्था या तपासात आपल्याला सहकार्य करत आहेत. एएआयबी यांच्याशी सीआयडीचा सातत्याने समन्वय सुरू आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर आपल्या तपासात त्याचा निष्कर्ष लक्षात घेणार आहे, असे सीआयडीकडून स्पष्ट करण्यात आले.

 तपासातील निष्कर्षानंतर सीआयडी योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करून, त्याचा पुढील तपास करून न्यायालयात खटला दाखल केला जाईल. तपास अतिशय योग्य दिशेने सुरू आहे. तपासात केंद्रीय यंत्रणांची मते, काही तज्ज्ञांची मतेही घ्यावी लागणार आहेत. आपली मोठी टीम आहे. पुणे आणि नवी मुंबईचे सीआयडीचे पोलीस अधिक्षक तपास करत आहेत. तपास समाधानकारक आणि योग्य त्या वेगाने सुरू आहे, असे सीआयडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एएआयबीच्या तपासाचा स्कोप आणि सीआयडीच्या तपासाच्या स्कोपमध्ये भिन्नता आहे. एएआयबीच्या तपासाचा निष्कर्ष आल्यानंतर तो सीआयडीच्या तपासात घेतला जाईल, असे सीआयडीकडून स्पष्ट करण्यात आले. आमच्या तपासाचा स्कोप गुन्हेगारी षडयंत्र, गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, गुन्हेगारी निष्काळजीपणा आहे का, या तीन दिशेने सुरू आहे. तपासात टाईमलाईन नसतात, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. या तपासात अनेक एजन्सी सहभागी आहेत. ठिकठिकाणाहून डेटा मिळवावा लागेल, त्यासाठी वेग लागणार आहे, असे सीआयडीकडून तपास पूर्ण कधी होणार, यावर स्पष्टीकरण दिले.

तपासामध्ये अनेक पुरावे समोर आले आहेत. हे पुरावे झपाट्याने गोळा केले आहेत. उरलेलेही गोळा केले जातील. जसेजसे अधिक पुरावे समोर येतील आणि निष्कर्ष निघेल, त्याबाबत त्यावेळी सांगितले जाईल, असे सीआयडीकडून सांगण्यात आले.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT