India vs Pakistan : IMF च्या भिकेपेक्षा काश्मीरचे बजेट दुप्पट, PoK सोडा! भारतीय महिला अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला धू धू धुतले…

Anupama Singh Geneva speech : पाकिस्ताने भारताच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. त्यामुळे त्यांनी पीओके सोडायला हवे, असे अनुपमा सिंह यांनी ठणकावून सांगितले.
Anupama Singh in UN
Anupama Singh in UNSarkarnama
Published on
Updated on

India Pakistan UN debate : जागतिक व्यासपीठावर सातत्याने भारताकडून मानवाधिकारांचे उल्लंघन केले जात असल्याचे रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानची भारतीय महिला अधिकाऱ्याने आज बोलती बंद केली. पाकिस्तानचा अजेंडा मोडून काढताना त्यांच्या अर्थव्यवस्थेबाबत आरसाही दाखविला. तसेच थेट पाकव्याप्त काश्मीर सोडा, असेही ठणकावून सांगितले.

नेमकं काय घडलं?

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्रामध्ये IFS सेवेतील अधिकारी अनुपमा सिंह या भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. परिषदेमध्ये पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्यावर भारतावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता. सिंह यांनी भारताची प्रतिमा मलीन करण्याचे पाकिस्तानेच मनसुबे उधळून लावले. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्या पाक तोंडावर आपटले.

पाकिस्ताने भारताच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. त्यामुळे त्यांनी पीओके सोडायला हवे, असे सिंह यांनी ठणकावून सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये बनविण्यात आलेला जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुल पाकिस्तानला नकली वाटत असेल तर त कदाचित सद्यस्थितीपासून खूप दूर असून काल्पनिक जगात जगत असल्याचेही त्या म्हणाल्या.

Anupama Singh in UN
Supreme Court : मोठी घडामोड : मोदी सरकारची सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफी, ‘त्या’ दोन व्यक्ती मंत्रालयात कधीच दिसणार नाहीत...

जम्मू आणि काश्मीरचे बजेट पाकिस्तानला IMF कडून नुकत्याच मिळालेल्या पॅकेजपेक्षा दुप्पट आहे. पाकिस्तान त्यासाठी आयएमएफपुढे झोळी पसरत असते, असे सांगत सिंह यांनी पाकला आरसा दाखविला. जम्मू-काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे. १९४७ च्या इंडियन इंडिपेडेंस कायदा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारतातील समावेश कायदेशीर आहे. खरा मुद्दा पाकने बेकायदेशीरपणे काश्मीरवर केलेला कब्जा हा आहे, असे सिंह म्हणाल्या.

Anupama Singh in UN
BMC budget update : फडणवीस ठाकरेंना म्हणाले होते, रिसीट चाटायच्यात का? सत्ताबदल होताच नाकावर टिच्चून घेतला सर्वात मोठा निर्णय...

लोकशाहीवरूनही सिंह यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले. ज्या देशातील सरकारे आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नाहीत, त्यांनी लोकशाहीवर भाषण ठोकणे योग्य नाही. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत झालेल्या विक्रमी मतदानातून तेथील लोकांनी दहशतवाद आणि हिंसेचे राजकराण नको असल्याचे दाखवून दिले आहे. आता ते विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. पाकिस्ताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून भाषणबाजी करण्यापेक्षा देशातील अंतर्गत संकटावर लक्ष द्यायला हवे, असेही अनुपमा सिंह यांनी पाकला सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com