Rohit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी सविस्तर प्रेझेंटेशन देखील केले होते. दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीला गेले होते. गृहमंत्री तसेच नागरी उड्डाणमंत्री तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनाल (DGCA) यांची ते भेट घेणार होते. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्याविषयी रोहित पवारांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
ते म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका निर्माण झाल्या असून तथ्यांसह या शंका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपुढे मांडल्या. याच विषयावर गृहमंत्री अमित शाह साहेब, नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू जी तसेच DGCA ची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट होऊ शकली नाही.
त्यामुळं प्रेझेंटेशनसह आमच्या सर्व शंका गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA यांना ई-मेल पाठवून या अपघाताबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची विनंती केली. याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या अनेक प्रश्नांची वस्तुनिष्ठ उकल होईल, असा विश्वास आहे.
पत्रकार परिषद घेतल्यानंतर तपासाला काही प्रमाणात वेग आला असला तरी अद्यापही अपेक्षित वेगाने तपास मात्र होताना दिसत नाही. माननीय गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळे वेळ देता आला नसेल परंतु DGCA ने वेळ का दिला नाही, हे मात्र समजले नाही. यंत्रणांनी वेळ दिला नसला तरी सर्व माहिती यंत्रणाकडे पाठवली आहे, सत्तेत नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावा करतच आहोत, राज्य सरकार आणि सत्तेतील सर्वचजण देखील यासाठी पाठपुरावा करतील, ही अपेक्षा, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.