Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात खासदार म्हणून झाली, असे अनेकांना वाटते. मात्र, खासदार होण्यापूर्वीच ते तब्बल वर्ष राजकारणात सक्रीय होते. त्यांच्या राजकीय जडणघडणीला 1982 साली प्रारंभ झाला.
सहकारी साखर कारखाना, सहकारी संस्थांच्या निवडणुकीत त्यांची एन्ट्री झाली. आणि ते श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवडून आले. सहकाराच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली.
अजित पवार यांनी 1991 मध्ये संसदीय राजकारणात सक्रीय झाले. बारामतीचे खासदार म्हणून ते विजयी झाले. मात्र, शरद पवार यांनी केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा आपल्या काकांसाठी त्यांनी अवघ्या अडीच महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला. शरद पवार त्या जागेवरून विजयी झाले. तर, शरद पवारांच्या बारामतीमधील रिक्त विधानसभेच्या जागेवरून अजित पवार विधानसभेत गेले.
लोकसभेतील विजयानंतर अजित पवार हे पुणे जिल्हा सहकारी बँकेवर ते निवडून गेले. ते बँकेचे अध्यक्षही झाले. सलग 16 वर्ष म्हणजे 2017 पर्यंत बँकेच्या अध्यक्षपदी कायम होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.