Ajit Pawar
Ajit Pawar  sarkarnama
पुणे

`सुनील शेळकेंना गळ टाकला अन् 30 वर्षांचं रखडलेलं काम झालं...`

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मावळ विधानसभा मतदारसंघात माझ्या मनात नेहमी खंत होती. हा जिल्हा पवार साहेबांचा पण मावळात आपला आमदार नाही, हे बोचत होते. मात्र, ज्यावेळी संजय भेगडेंना वगळून सुनील शेळकेंना भाजपकडून तिकीट मिळणार नाही तेव्हा लगेचच गळ टाकला. सुनील शेळकेंना राष्ट्रवादीचं तिकीट जाहीर केलं, असे सांगत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मावळ विजयाचा आनंद दोन वर्षांनी देखील व्यक्त केला. वडगाव मावळातील विकासकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, मावळात भाजपाच्या विरोधात 1990 नंतर कधीच भाजप विरोधी आमदार निवडून आला नाही. ही मनात खंत होती. पवार साहेबांचा जिल्हा पण मावळात काही गाडी जमत नव्हती. काय घोड पेंड खायच कळायचच नाही! कार्यकर्ते जमत होते. कुरबुर सुरूच असायची. पण यश मिळात नव्हते. मावळात तिकीट कोणाला द्यायचं याचा विचार 2019 मध्ये केला. भाजप तर विद्यमान आमदार बाळ भेगडेला तिकीट देणार. मग सुनील शेळकेंवर गळ टाकला. तो बिचारा राष्ट्रवादी भवनात पोचायच्या आतच त्याच तिकीट जाहीर करून टाकलं. शेळकेंना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली तर, सगळे काम करतील, असे मला सांगितले होते. आमच्या वरीष्ठांना पण विश्वास नव्हता. मात्र, जेव्हा निकाल लागला तेव्हा 95 हजारांचे मताधिक्य शेळके यांना मिळाले. मला तर कळना काय झालं ते, या शब्दात पवार यांनी आमदार शेळके यांचे कौतुक केले.

पवार साहेबांनी राज्यातील विविध भागातील काही हिरे निवडले. त्यात परळीत धनंजय मुंडे, नगर जिल्ह्यातील पारनेर येथे निलेश लंके आणि मावळात सुनील शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला हिरे सापडले आहेत. येथील विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पवार म्हणाले की मावळ गोळीबार प्रकरणात मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्ही शेतकरी, मी शेतकरी आहोत. मी माझ्या राजकीय 30 वर्षांच्याा जीवनात कधीच सत्तेचा गैरवापर करत विरोधकांना त्रास दिला नाही, असा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT