harshavardhan patil | bala bhegade | asha buchake | ajit pawar sarkarnama
पुणे

Ajit Pawar : हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे अन् काळे झेंडे दाखविणाऱ्या आशा बुचकेंनाही अजितदादांकडून 'DPDC'चा निधी; पण...

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, जुन्नर आणि मावळ मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मात्र, तीनही मतदारसंघावर भाजपकडून दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिकीट न मिळाल्याल येथे बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संभाव्य धोका अजितदादांनी हेरला आहे.

अजितदादांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ( डीपीडीसी ) माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ), बाळा भेगडे आणि आशा बुचके यांना एक कोटी रूपयांचा निधी दिला आहे. तर, महायुतीच्या विद्यमान आमदारांची 30 ते 50 कोटी रूपयापर्यंत कामे मंजूर केली आहेत.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 300 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. मात्र, अजितदादांच्या ( Ajit Pawar ) आमदारांविरोधात बंडखोरी करण्याची तयारी करत असलेल्यांना निधी देताना हात आखडता घेतल्याचं दिसून येत आहे. त्यासह भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन आमदारांना निधी दिला नसल्याचं समोर येत आहे. अजितदादांनी महायुतीतील बंडखोरांना आळा घालण्यासाठी पाऊल उचलले आहे. तरी जिल्ह्यातील महायुतीतील तीनही पक्षांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

दौंडमध्ये आमदार राहुल कुल आणि खडकवासल्यात आमदार भीमराव तापकीर यांना निधी वाटप केले नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत भाजपचे नेते, ऊर्जा व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील कोणती भूमिका घेणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

त्यासह काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि आमदार संजय जगताप यांना 'डीपीडीसी'चा निधी देण्यात आलेला नाही. मात्र, थोपटे आणि जगताप यांच्या मतदारसंघातील अजितदादा यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मात्र कोट्यवधी रूपयांचा निधी वाटप आणि कामांच्या शिफारसी देण्यात आल्या आहेत. 'डीपीडीसी'चा जिल्ह्याचा 1 हजार 256 कोटी रूपयांचा सर्वसाधारण आराखडा आहे. त्यात पहिल्या टप्प्यात तीनशे कोटी रूपयांची कामे मंजूर केली आहेत.

आशा बुचकेंनी अजितदादांना दाखवलेले काळे झेंडे...

आशा बुचके या भाजप जुन्नर विधानसभा प्रमुख आहेत. काहीदिवसांपूर्वी अजितदादांच्या पक्षाची 'जनसन्मान यात्रा' जुन्नर विधानसभेत आली होती. तेव्हा, आशा बुचके यांनी काळी साडी परिधान करत थेट अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले होते. "जुन्नरमध्ये पर्यटन विषयाची बैठक पार पडत आहे. मग आम्हाला का डावलण्यात आलं? महायुती आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बैठकीत का नाही? पालकमंत्री म्हणून फक्त अजितदादादांचा फोटो का लावण्यात आला?" असा प्रश्नांच्या फैरी आशा बुचके यांनी उपस्थित केल्या होत्या.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT