Assembly Election : मावळात भाजपची शरद पवारांच्या उमेदवारासाठी 'फिल्डिंग'?, नेमकं काय आहे प्रकरण?

NCP Ajit Pawar Group Leader Sunil Shelke's Allegation : महायुती मध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. असाच मिठाचा खडा आता मावळ विधानसभा मतदारसंघात पडल्या असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नेमकं काय आहे प्रकरण?
Devendra Fadanvis & Sharad Pawar
Devendra Fadanvis & Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत. तसे महायुती मधील मित्र पक्षातील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण अधिक ठळकपणे पुढे येऊ लागले आहे. पुणे जिल्ह्यातील ज्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्या ठिकाणी भाजपच्या संभावित तिकिटाच्या दावेदारांनी महायुती मध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम सुरू केलं आहे. असाच मिठाचा खडा आता मावळ विधानसभा मतदारसंघात पडल्या असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

मावळमध्ये सध्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आहेत. मात्र तरी देखील भाजपने या जागेवर दावा केला आहे. जागा वाटपाच्या वाटाघाटी मध्ये ही जागा आपल्याकडे घ्यावी असा आग्रह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे धरला आहे. असं असलं तरी ही जागा भाजपला सुटणे काहीसे कठीण आहे. अशातच (NCP) अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी मोठा गंभीर गौप्यस्फोट केला आहे. मावळ मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही भाजपला चालत नाही मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी चालते असा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

Devendra Fadanvis & Sharad Pawar
Ashwini Jagtap : 'तुतारी' हाती घेणार असल्याची चर्चा, भाजप आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या,'पक्ष सोडून जाणं...'

सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. सुनील शेळके म्हणाले, सध्या मावळ मध्ये भाजपचे काही पदाधिकारी हे अजित पवार कसे चुकीचे आहेत. मावळ गोळीबार अजित पवारांनी करायला लावला, अजित पवार (Ajit Pawar) कसा अन्याय करत आहेत, विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करायची नाही अस लोकांपर्यंत पोहचवत आहेत. हे करत असताना मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कशी मदत करता येईल याची रणनीती मावळ मधील भाजप करत असल्याचा देखील आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला.

Devendra Fadanvis & Sharad Pawar
Ashwini Jagtap : 'तुतारी' हाती घेणार असल्याची चर्चा, भाजप आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या,'पक्ष सोडून जाणं...'

यापूर्वीच मावळ येथील भाजपने सुनील शेळके (Sunil Shelke) यांचा प्रचार न करण्याबाबतचा ठराव पास केला आहे. शेळके यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी यापूर्वी शड्डू ठोकला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या अशाच प्रकारची परिस्थिती दौंड वडगाव शेरी, शिरूर आणि इंदापूर मध्ये पाहायला मिळत आहेत. या सर्व ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमने-सामने आला आहे. त्यामुळे यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com