Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : बारामतीवरून अजित पवारांचा काकांना खडा सवाल; म्हणाले, 'बारामतीचा विकास कुणी...'

Baramati Development : शहर व ग्रामीणचे अध्यक्षही वकीलच झालेत

मिलिंद संगई, बारामती

Baramati Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार गटाला सडतोड उत्तर दिले आहे. आता अजितदादांनी बारामतीच्या विकासावरून खडा सवाल केला. शहरातील एका खासगी कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी, बारामती कोणी उभी केली, हे आपल्या अंतरमनाला विचारा, असा रोखठोक प्रश्न केला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे.

अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शहरातील कामांचा आढावा घेतला. कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी न्यायालयाच्या आवारातील अस्वच्छतेचा विषय काढला. ते म्हणाले वकील लोकांनी याकडे लक्ष द्यायला हवे.'

'काही जण कोठे अध्यक्ष होतात, कोठे काय होतात, मग इकडे बघायला काय होतय? शहर व ग्रामीणचे अध्यक्षही वकीलच झालेत,' असा चिमटाही काढला. आता त्यांनी त्यांच्या अंतर्मनाला विचारावे की खरेच काम कोण करतेय? आज जी बारामती उभी केलीय ती कोणी उभी केली. आता मला त्या खोलात जास्त जायचे नाही, असेही पवार म्हणाले.

पदाधिकाऱ्यांना टोकले

अजितदादांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या स्टाईलने शेलक्या शब्दात टोले लगावले. ते म्हणाले, ज्यांना पदे दिली, जीवापाड प्रेम केले, त्या लोकांनी माझ्यासोबत कधी गावोगावी फिरून काम केले नाहीत. आता मात्र घोंगडी बैठका घेतात. काय चालले हे. कोण काय करतेय, याकडे लक्ष असते. यावरून एखाद्या दौऱ्यात चिडलो की म्हणायचं, हे असलेच आहेत. खरेच एकेक नग आहेत नग... ओवाळून टाकले पाहिजेत, असाही राग त्यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामतीच्या (Baramati) विकासावर बोलताना त्यांनी विरोधकांना चॅलेंजही दिले. ते म्हणाले, आमदार म्हणून मी बारामतीत जितके काम केले आहे तितका पुढचा कोणीच आमदार करणार नाही. फुशारकी म्हणून सांगत नाही, पण पहाटे पाचपासून कामाला लागतो, हे लक्षात ठेवायला हवे, याची जाणही त्यांनी यावेळी करून दिली.

बारामती स्वच्छ करायची

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बारामतीचा स्वच्छतेत क्रमांक एकवर आणण्याचा मनसुबाही अजितदादांनी यावेळी बोलून दाखवला. ते म्हणाले. 'माझ्या मनात जे आहे तसे तुम्ही वागला तर बारामती स्वच्छ होते. बारामती विकासात अग्रेसह आहेच. आता स्वच्छतेच्या बाबतीतही बारामती देशात पहिला नंबर येईल, असे म्हणत बारामतीकर स्वच्छतेबाबत उदासिन आहे,' अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT