Uday Samant : काँग्रेसवर नेम, पण उद्धव ठाकरेंना शह; उदय सामंतांचं रत्नागिरीत नेमकं काय सुरू ?

Milind Deora : काँग्रेसच्या मिलिंद देवरांना शिंदें गटात येण्याची ऑफर
Uday Samant, Milind Deora
Uday Samant, Milind DeoraSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News : काँग्रेसचे मिलिंद देवरा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे. यावरूनच आता औद्योग मंत्री उदय सामतांनी ठाकरेंना चेक देण्याचे संकेत दिले आहेत. मिलिंद देवरा यांच्यासारख्या नेत्याची एकनाथ शिंदेंना साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना अधिक भक्कम होईल, असे वक्तव्य करत सामंतांनी धुरळा उडवून दिला. तसेच त्यांनी 14 तारखेपासून काय होते ते पाहा, असा थेट इशाराही ठाकरेंना दिला.

'काँग्रेसचे मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्या मनात पक्षात येण्याची इच्छा असेल तर शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांच्या विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा. सहकारी म्हणून देवरा यांचा चेहरा मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीने वाढेल. ते लोकांमध्ये जावून काम करणारे नेतृत्व आहे,' अशा शब्दात सामंतांना मिलिंद देवरांचे कौतुकही केले.

Uday Samant, Milind Deora
Sharad Pawar NCP : रत्नागिरीत शरद पवारांना मोठा धक्का; तब्बल 15 पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून शिंदे गटाचे आमदार संपर्कात असल्याचा वारंवार दावा केला जातो. याबाबत सामंत म्हणाले, 14 तारखेपासून काय होतेय, ते पहा, असा थेट सूचक इशाराच ठाकरेंना दिला आहे.

दरम्यान, शनिवारी उद्धव ठाकरे खासदार श्रीकांत शिंदेंच्या कल्याण मतदारसंघाचा दौरा केला. यावर विचारले असता सामंत म्हणाले, शिंदेंचा बालेकिल्ला आबादीत आहे. कोणी कितीही श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात गेले तरी त्यांना धोका नाही. ते लोकसभेत विजयाची हॅट्रिक करतील, असा विश्वास सामतांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उदय सामंतांना (Uday Samant) महाविकास आघाडीचाही समाचार घेतला. 'महाविकास आघाडीचे नेते सध्या हे सैरभैर झालेत. ज्या महाविकास आघाडीला पंतप्रधानांचा चेहरा नाही त्यांचा आम्ही विचार करत नाही. पहिले त्यांनी पंतप्रधानाचा चेहरा जाहीर करावा. मोदींच्या विरोधात १० ते २० टक्के मतदान घेणारा चेहरा त्यांनी जाहीर करावा,' असे आव्हानच त्यांनी आघाडीतील घटक पक्षांना दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Uday Samant, Milind Deora
Kanhaiya Kumar : 'हॅप्पी बड्डे' बोलण्यासाठी पंतप्रधान ईडीच पाठवतील; कन्हैयाकुमारांचा टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com