Ajit Pawar addressing the NCP Foundation Day event in Pune, responding to accusations regarding lack of financial support from the state government.  sarkarnama
पुणे

Ajit Pawar : ‘’अरे पैसे सोडत नाही.., काय माझ्या खिशात पैसे घेवून बसलोय’’ ; अजित पवार स्पष्टच बोलले!

Ajit Pawar responds to funding allegations during NCP Foundation Day in Pune - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुण्यातील वर्धापन दिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्यावर निधी वाटपाबाबत होणाऱ्या आरोपास परखडपणे उत्तर दिले शिवाय, विविध मुद्यय्यांवर पक्षाची भूमिकाही मांडली.

Mayur Ratnaparkhe

Ajit Pawar addressing the NCP Foundation Day event - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज वर्धापन दिन सोहळा पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास मोठ्यासंख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी भाषणात अजित पवारांनी विविध मुद्य्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करतानाच, त्यांच्यावर निधी देत नसल्याच्या सततच्या होणाऱ्या आरोपालाही स्पष्टपणे उत्तर दिले.

अजित पवार म्हणाले, ''कधीकधी काही काहीजण अशा बातम्या सोडतात, की अजित पवार पैसे सोडत नाहीत. अरे पैसे सोडत नाही.. काय माझ्या खिशात पैसे घेवून बसलोय? शेवटी राज्य सरकराने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही २० ट्कके सोडतो, दुसऱ्या तिमाहीत ४० ट्कके सोडतो, तिसऱ्या तिमाहीत ६० टक्के सोडतो. नंतर ८० टक्के आणि शेवटच्या महिन्यात १०० टक्के. अशा पद्धीतचे ते नियोजन असतं.''

तसेच ''मागील मंत्रीमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्याचेवळी लक्षात आलं की, अशाच पद्धतीने अनुसूचित जातीला देखील दिलं पाहीजे. कारण, आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता. आम्ही सांगितलं की पुढील कॅबिनेटमध्ये हा विषया आला पाहीजे.''

याचबरोबर, ''आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या महायुती सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचंही काम केलं आहे. अनेक कार्यकर्ते, सहकारी आहेत शेवटी आपल्याला काम करायचं आहे. जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून दिलेलं आहे. आता जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जावू द्यायचा नाही. तशा पद्धतीने आपल्या सगळ्याचं काम सुरू झालेलं आहे.'' असंही अजित पवारांनी बोलून दाखवलं.

याशिवाय, ''आज आपल्या पक्षाचा वर्धानपन दिन सोहळा हा मुख्य पुण्यात होत असला, तरी राज्याच्या आणि देशाच्या इतरही भागात जिथं जिथं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, ते देखील आजचा हा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्याही गोष्टीचं समाधान मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे.'' अशी माहितीही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT