Election Commission on Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचाही पलटवार; काँग्रेसला विचारला 'तो' गंभीर प्रश्न!

Election Commission responds to Rahul Gandhi's allegations - भारतातातील मतदार इतके हुशार आहेत की ते हे समजून घेऊ शकतात की काँग्रेस प्रत्येक वेळी निवडणूक हरल्यावर आयोगाला दोष का देऊ लागते, असा टोलाही लगावला.
Election Commission on Congress allegations
Election Commission on Congress allegationssarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi’s Allegations Against the Election Commission : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि निवडणूक आयोग यांच्यातील सवाल जबाबची मालिका सुरूच आहे. राहुल गांधींकडून झालेल्या आरोपांना निवडणूक आयोगची चोख प्रत्युत्तर देत आहे. आज पुन्हा राहुल गांधींच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पलटवार केला.

निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी केले आहे. प्राप्त माहितीनुसार, राहुल गांधी यांनी केलेले आरोप निराधार आहेत आणि आतापर्यंत त्यांनी आयोगाला भेटण्याची वेळा मागितलेली नाही किंवा त्यांनी कोणतीही औपचारिक तक्रार किंवा पत्र पाठवले नाही. असं आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, दोन दिवस उलटूनही राहुल गांधींनी आयोगाला भेटण्यासाठी वेळ मागितला नाही किंवा कोणताही तक्रार अथवा पत्र सादर केले नाही. आयोगाने असा प्रश्न उपस्थित केला की, जर त्यांची तक्रार आहे, तर मग ते भेटण्यास का येत नाहीत? तसेच, निवडणूक आयोगाने असेही स्पष्ट केले की, काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी आयोगाने योग्य उत्तर दिले आहे, जे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Election Commission on Congress allegations
Indian Economy Growth - मोदी सरकारची ११ वर्षांतील दमदार कामगिरी फक्त एका क्लिकवर!

आयोगाने काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील सर्व बूथवर बूथ लेव्हल एजंट नियुक्त करण्याचा आणि मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे, ही प्रक्रिया दरवर्षी निवडणुकीपूर्णी नियमित होते.

याशिवाय आयोगाने असेही म्हटले आहे की, सर्व राजकीय पक्षांच्या बीएलएसाठी आयोगाच्या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण कार्यक्रम आधीच सुरू आहेत. जर काँग्रेसला त्यात सहभागी व्हायचे नसेल तर त्यांनी असा विश्वास ठेवला पाहिजे की, १९५० च्या आरपी कायद्याच्या कलम १३ ब(२) अंतर्गत निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल बूथ लेव्हल ऑफिस निष्पक्षपणे काम करत आहेत.

Election Commission on Congress allegations
Bihar election : तेजस्वींचे भाग्य लालू यादव बदलणार, की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच असणार!

आयोगाने म्हटले आहे की, मतदार यादी तयार करणे मतदान करणे आणि मतमोजणी करणे ही जबाबदारी अनुक्रमे ईआरओ, पीआओ आणि आरो  यांच्यावर आहे, जे कलम ३२४ अंतर्गत निवडणूक आयोगाच्या निर्देश आणि नियंत्रणाखाली काम करतात. तथापि, शेवटी मतदारच ठरवतात की त्यांना कोणाला निवडून द्यायचे आहे.

आयोनाने काँग्रेसवर टीका केली आणि म्हटले की, जर एखाद्या राजकीय पक्षाला निवडणूक निकालांची आगाऊ तयारी करयाची असेल, तर त्यांनी राजकीय क्षेत्रात ते करावे आणि पंचांशी लढत असल्याचा आभास निर्माण करू नये. तसेच आयोगाने अम्हटले हे की, भारतातातील मतदार इतके हुशार आहेत की ते हे समजून घेऊ शकतात की काँग्रेस प्रत्येक वेळी निवडणूक हरल्यावर आयोगाला दोष का देऊ लागते.

(Edited By - Mayur Ranaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com