Ajit pawar Tanaji Savant Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : ‘राष्ट्रवादी’वर जहरी टीका करणाऱ्या तानाजी सावंतांना अजितदादांनी खास शब्दांत केलं 'क्लिन बोल्ड'  

Ajit Pawar’s sharp reply to Tanaji Sawant : राष्ट्रवादीवर टीका करताना तानाजी सावंत म्हणाले होते की, राष्ट्रवादीची औलाद अशी आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही.

Sudesh Mitkar

Pune News : आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये गळ्यात गळे घालणारे महायुतीचे मित्र पक्षातील नेते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकामेकांचे वैरी असल्यासारखे वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीवर गंभीर टीका केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये धाराशिवमध्ये आपण स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे सावंत यांनी जाहीर केले आहे. हा स्वबळाचा नारा देताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बाबत वादग्रस्त विधान केले होते. राष्ट्रवादीची औलाद अशी आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही, असे सावंत म्हणाले आहेत.

सावंत यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाचार घेतला आहे. ते म्हणाले, सावंत यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचत आहे. आम्हाला त्याबाबत जास्त काही बोलायचं नाही. कारण सुसंस्कृत महाराष्ट्रात आम्ही राजकारण करतो. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तो सुसंस्कृतपणा आम्हाला शिकवलेला आहे. दुसऱ्यांनी वेडेपणा केला, अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्य केली की आम्ही त्याला उत्तर देणं चुकीचं आहे. त्यामुळे अधिकचे मला याबाबत बोलायचं नाही, असा शब्दांत अजित पवार यांनी सावंत यांचा समाचार घेतला.

काय म्हणाले होते सावंत?

राष्ट्रवादीवर टीका करताना तानाजी सावंत म्हणाले होते की, '2022 ला सत्तांतर केल्यानंतर मी एकमेव युतीतील आमदार आहे, जो बोलत होतो ही परिस्थिती राहणार नाही. कारण, राष्ट्रवादीची औलाद अशी आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं त्यांचं होतं. वर्षाच्या आतच ते खरं ठरलं.'

'त्यावेळी मी हे देखील सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. वेगवेगळ्या नाहीत. याचा प्रत्यय तुम्हाला मागील दहा पंधरा दिवसांत आला असेल. कोणाला पटो ना पटो माझी जी मतं आहेत ती आहेत.', असे देखील सावंत म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT