Ajit Pawar News Sarkarnama
पुणे

Shasan Aplya Dari Jejuri : राज्यात मोठे उद्योग यावेत; अजितदादांनी मल्हारी मार्तंडाच्या चरणी केली प्रार्थना

Ajit Pawar Speech : राज्य सरकारच्या वतीने 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम राबवला जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Shasan Aplya Dari News : राज्य सरकारच्या वतीने 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम राबवला जात आहे. सोमवारी हा कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील जेरुरीमध्ये पार पडला. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. ८० हजार कोटींची कामे केंद्र सरकारच्या सहकार्याने करण्यात येत असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

जेजुरी येथे 'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थितीत होते. यावेळी शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी अजित पवार म्हणाले, जेजुरीच्या पवित्र भूमीत मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊन सगळीकडे सुजलाम् सुफलाम् वातावरण निर्माण व्हावे, राज्यात मोठे उद्योग यावेत याची प्रार्थना केली.

विकासासाठी महामार्ग महत्त्वाचे असून पालखी महामार्ग वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विमानतळ, रस्ते, उद्योग, कालवे करताना जमिनीची आवश्यकता असते. जेजुरी विकासासाठी १०९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध, असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. राज्यातील उपसा सिंचन योजनांना सवलतीच्या दराने वीज पुरवण्यासाठी ६७५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेची दुरुस्ती आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर केले.

खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याच्या २ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे साडेतीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील सिंचन योजना मार्गी लावण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. लाभार्थ्यांनी विविध योजनांमधून मिळालेल्या लाभाचा उपयोग कुटुंबाच्या उन्नतीसाठी करावा, असेही पवार म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT