Pune Court News: पोलिसांनी दोन दिवसात दोषारोपपत्र दाखल केले अन् कोर्टानेही लगेच दिला निकाल

Pune Police News : पोलिसांनी आणि न्यायालयाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपीला अवघ्या तीन दिवसांमध्ये शिक्षा झाली.
Court News
Court NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : न्यायालयामध्ये न्याय मिळवण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागते, असे सगळ्यांचाच अनुभव असतो. पोलिसांनी आणि न्यायालयाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपीला अवघ्या तीन दिवसांमध्ये शिक्षा झाली. एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा विनयभंग करणाऱ्याला गुन्हा दाखल झाल्यापासून तीन दिवसांत न्यायालयाने शिक्षा सुनावली.

चंदननगर पोलिसांनी (Police) दोन दिवसात या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपीला सात दिवसांची कैद आणि २०० रुपये दंड कोर्टाने (Court) ठोठावला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी हा निकाल दिला. या निकालाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Court News
Pune Crime News: गुंडाला हॉटेलवर घेऊन जाणे भोवले; तीन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

या प्रकरणात अमोल नानाजी कांबळे (रा. थिटे वस्ती, खराडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. विनयभंग आणि धमकी दिल्याच्या कलमांनुसार ही शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास कांबळे याला दोन दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात दोन ऑगस्टला गुन्हा दाखल झाला होता. पाच ऑगस्टला कांबळेला शिक्षा सुनावण्यात आली.

Court News
Shailaja Darade Arrested: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडेंना अटक

या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे योगेश कदम यांनी पाहिले. पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके यांनी या गुन्ह्याचा तपास केला आहे. त्यांना न्यायालयीन कामासाठी अंमलदार हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली. घटना घडलेल्या दिवशी म्हणजे दोन ऑगस्टला कांबळेला अटक करण्यात आली होती. तीन ऑगस्टला त्याची कारागृहात रवानगी झाली. तर चार ऑगस्टला दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.