सरकारनामा ब्यूरो
पुणे : राज्य सरकारमधील सर्व घटक पक्षांनी मिळून महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच अंतिम केली आहे. या निर्णयात आता बदल होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात स्पष्ट केले.
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धती असावी, अशी मागणी आपण कधीही केली नव्हती. त्यामुळे अजित पवार हे दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत आग्रही होते, हे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पवार म्हणाले, ‘‘तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा फायदा नेमका कोणत्या राजकीय पक्षाला होणार, हे निवडणूक निकालानंतरच समजू शकेल आताच त्याबाबत भाष्य करता येणार नाही. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत आघाडी करायची की नाही, हे स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे याबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहूनच घेतला जावा, असे माझे व्यक्तीगत मत आहे.’’
सध्या राज्यातील काही महापालिकांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. या महापालिकांतील भाजपची ताकद कमी करून, या पालिकांमध्ये स्वतःच्या पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष आपापल्या परीने करत आहेत. त्यामुळेच पालिकांची प्रभाग पद्धती आपल्याच सोईची कशी होईल, या सर्वच पक्षांकडून प्रयत्न केले जात होते. यातूनच प्रभाग पद्धती नेमकी किती सदस्यीय असावी, याबाबत या तीनही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. परिणामी याबाबत अंतिम निर्णय होत नव्हता.
पुण्यात दोन सदस्यांचा प्रभाग असावा, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी होती.पवार यांच्याकडे तसा आग्रहदेखील धरण्यात आला होता. मात्र, राज्य पातळीवर एक आणि पुण्यासाठी एक निर्णय करणे अजित पवार यांच्या हाती नव्हते. त्यामुळे तीन सदस्यीय प्रभाग पद्धती मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता.E
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.