पुण्याचे महापौर मोहोळ म्हणाले; सिरींज अभावी आता लसीकरण बंद राहणार नाही

महापालिकेने ‘इमर्जन्सी’ खरेदी केल्या एक लाख सिरींज
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

पुणे : कोरोना प्रतिबंधक लस पुरवठा झाला. मात्र, ही लस देण्यासाठी सिरींज उपलब्ध न झाल्याने आज पुण्यात लसीकरण ठप्प झाले. महापालिकेने एका दिवसात तब्बल एक लाख सिरींज खुल्या बाजारातून खरेदी केल्याने उद्यापासून (ता.१) नियोजनानुसार लसीकरण सुरू राहील, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

शहरात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यापासून डोससोबत सिरींजचाही पुरवठा होत होता. मात्र, राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवायच सिरींजचा पुरवठा बंद झाला. शिवाय, ही सिरींज खुल्या बाजारात उपलब्ध नाही. त्याचा परिणाम लसीकरणावर झाला, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ लसीकरण बंद राहू नये म्हणून तातडीने एक लाख पर्यायी सिरींज खरेदी केल्याने लसीकरण सुरळीत झाले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुणे महापालिकेने दोन्ही लाटांचा आजवर सक्षमपणे सामना करत सर्व यंत्रणा उभ्या केल्या.’’

Murlidhar Mohol
देशात पुणे जिल्हा बँकेची आघाडी : शेतकऱ्यांना पाच लाखांचे कर्ज शून्य टक्के दराने

लसीकरणासाठी "0.5 एमएल एडी' या सिरींज वापरल्या जातात. केंद्राकडून राज्याला आणि राज्याकडून आरोग्य परिमंडळांना लस दिली जाते. त्यांच्याकडून ती लस जिल्हा आणि शहरांना गरजेनुसार पुरवली जाते. या लसींच्या डोस इतकेच सिरींजही दिल्या जातात. परंतु गेल्या दोन दिवसांपासून लसींच्या डोस इतके सिरींज मिळत नव्हत्या. सिरींज कमी आल्यामुळे त्याचे वाटपही कमी केले जात होते. परिणामी डोस शिल्लक असून देखील सिरींज नसल्यामुळे महापालिकेवर गुरूवारी लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की आली होती. बजाज कंपनीने एक लाख डोस महापालिकेला ‘सीएसआर’ मधून दिले आहेत. त्यांनी सव्वालाख सिरींजही दिल्या आहेत. त्याचा वापर सध्या झोपडपट्टींमध्ये केला जात आहे.

Murlidhar Mohol
निवडणुकांपुरतं लक्ष घालून सत्ता मिळत नाही; दरेकरांचा खासदार राऊतांना चिमटा

"किमान पाच ते सहा लाख सिरींज खरेदी करून द्या' असे पत्र महापालिकेच्या लसीकरण विभागाने आरोग्य प्रमुखांना दिले आहे. ही इमर्जन्सी निर्माण झाल्याने तूर्तास एक लाख सिरींजची खरेदी महापालिकेने केली आहे. उर्वरीत सिरींजबाबत निविदा काढण्यात आल्याचे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले. महापालिकेने खरेदी केलेले सिरींज संध्याकाळपर्यंत (गुरूवार) ते येणे अपेक्षित होते. ते हातात आल्यानंतर त्याचा वापर करू, असे मनपा लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com