Ajit Pawar news 
पुणे

अजित पवार म्हणाले,'आम्ही विसरत नाही, वेळ आली की प्रत्येकाची दखल घेतो'

Covid 19| Ajit Pawar news| राजधानी मुंबईनंतर आता पुण्यात करोनाच्या नव्या व रियंटचे सात रुग्ण आढळले आहेत

सरकारनामा ब्युरो

बारामती : राजधानी मुंबईनंतर आता पुण्यात करोनाच्या नव्या व रियंटचे सात रुग्ण आढळले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना चौकशी करायला सांगितलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. तसेच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देखील त्याची माहिती घेण्यास सांगितलं आहे. मुंबईला गेल्यावर अधिक चर्चा करुन आणि आवश्यकता असल्यास जनतेला त्यासंदर्भात काळजी घेण्यासाठी सूचना देऊ, असही अजित पवार यांनी म्हटलंं आहे.

आज सकाळी त्यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ओमायक्रॉनचे BA4 आणि BA5 हे सब व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोना केसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोला देशांमध्ये BA4चे जवळपास 700 पेक्षा अधिक रुग्ण तर 17 देशात BA5चे 300 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचे विषाणूचे हे सब व्हेरिएंट संसर्गजन्य असले तरी ते घातक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण असं असलं तरी नागरिकांनी काळजी घेणे आणि सतर्क राहणे अधिक गरजेचे आहे. त्यासोबतच आरोग्य विभागालाही नव्या व्हेरिएंटची चौकशी करण्यास सांगितले असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेमध्ये कोविड घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे, यावरही अजित पवार यांनी उत्तर दिले. विरोधकांनी मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप केला. पण असे आरोप विरोधकांकडून होत असतात. कोणीही आरोप करतं, ज्यात काही तथ्य नाही, असेही आरोप केले जातात. पण तथ्य असेल तरच त्या आरोपाची दखल घेतली जाते, असं अजित पवार म्हणाले. याच वेळी त्यांना नवाब मलिक यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला कुणाचाही विसर पडत नाही. आम्ही कुणाची काळजी घ्यायची असते ती योग्यवेळी घेत असतो.

तसेच, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची टंचाई जाणवणार नाही, याची दक्षता राज्य सरकार घेत आहे. त्यासाठी नुकतीच खरिप हंगामात लागणाऱ्या बी-बियाणे आणि खतांसदर्भात खरिपपूर्व आढावा बैठकीत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याशी चर्चा केल्याचं अजित पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT