किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रीप्ट तयार करून शाहू महाराजांना दिली! फडणवीसांचा पलटवार

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची देवेंद्र फडणवीस आणि भाजपची खेळी होती, असा गौप्यस्फोट शाहू छत्रपती यांनी केला आहे.
BJP Leader Devendra Fadnavis Latest Marathi News
BJP Leader Devendra Fadnavis Latest Marathi News Sarkarnama
Published on
Updated on

नागपूर : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपची खेळी होती, असा गौप्यस्फोट शाहू छत्रपती यांनी केला आहे. त्यावर फडणवीस यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रीप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसतेय, असा पलटवार त्यांनी केला आहे. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. पश्चिम महाराष्ट्रात संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होत आहे. त्याचं नुकसान कुणाला आहे, असं म्हणत फडणवीस यांनी टीका केली आहे. त्यामुळे फडणवीस यांचा रोख नेमका कुणाकडे होता, यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

BJP Leader Devendra Fadnavis Latest Marathi News
शाहू महाराजांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत थेट कोल्हापूरातील राजवाड्यावर

काय म्हणाले फडणवीस?

शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्या गादीचा मोठा मान आहे. त्यामुळे त्यांनी कुठलंही मत व्यक्त केलं असलं तरी मी बोलणार नाही. त्यासंदर्भात संभाजीराजेंनी दिलेली प्रतिक्रिया पुरती बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचं दु:ख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रीप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसतेय. अशी माहिती महाराजांना देणाऱ्यांना समत नाही की, एकीकडे अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवत आहेत, असं फडणवीस म्हणाले.

महाराज आणि युवराजांमध्ये काहीतरी अंतर आहे, असं दाखवण्याचा काम करत आहेत. त्यामुळं असं काम करणाऱ्यांच्या या वागण्याबद्दल मला प्रचंड दु:ख आहे. छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व गेल्या सहा वर्षात चांगल्याप्रकारे तयार होत आहे. मराठा समाज, बहुजन समाजात एक आपुलकी निर्माण झाली आहे. असं नेतृत्व तयार झाल्यानंतर तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्याचं कुठलंही नुकसान भाजपला नाही. त्यांचं नुकसान कुणाला आहे, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हे नेतृत्व तयार होऊ नये, अशाप्रकारचा प्रयत्न कोण करणार हे साधं ज्याला राजकारण समजतं त्यालाही हे समजतं, अशी टीका फडणवीस यांनी केली.

BJP Leader Devendra Fadnavis Latest Marathi News
संभाजीराजेंचं नेमकं कुठं चुकलं? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

शाहू छत्रपतींनी कोणता गौप्यस्फोट केला?

संभाजीराजेंना अपक्ष लढवण्याची फडणवीस आणि भाजपची खेळी होती, असा खुलासा शाहूंनी शनिवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केला. ते म्हणाले होते की, या सर्व राजकारणामागे भाजपचाच हात आहे. संभाजीराजेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली नाही, त्यामुळं छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचा आरोप होत आहे. पण यामुळं हा छत्रपती घराण्याचा अपमान झाला, असं म्हणता येणार नाही. ती संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. त्यामागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपची खेळी होती. संभाजीराजेंना अपक्ष लढावं यासाठी त्यांनी भाग पाडलं.

बहुजन समाजाच्या मतांत विभाजन करण्यासाठी भाजपने हा डाव टाकला होता. संभाजीराजे हे जानेवारी महिन्यापासून राज्यसभेसाठी प्रयत्न करीत होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापन केली आहे. संभाजीराजेंना आता दीर्घकाळ लढा द्यावा लागणार असून, हा संघर्ष खूप मोठा आहे, असंही शाहू छत्रपतींनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com