Pune News : पुण्याच्या रासे येथील शासकीय कार्यक्रमाच्या सभेत सुनेत्रा पवारांसमोर अजित पवार यांच्या निर्णयक्षम कार्यपद्धतीची आठवण करून देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहितेपाटील भावूक झाले. खेड तालुक्यावरील अजितदादांच्या योगदानाचा उल्लेख करताना भरसभेत त्यांचे अश्रू अनावर झाले.
खेड तालुक्यातील रासे येथे झालेल्या सभेत दिलीप मोहिते-पाटील यांनी दुष्काळ, पाणीटंचाई आणि जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित केला. गावागावांतील नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास मांडत त्यांनी अजित पवार यांच्या तत्पर निर्णयक्षम कार्यपद्धतीची आठवण करून दिली. “दादांप्रमाणेच निर्णय घ्या,” अशी अपेक्षा त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे व्यक्त केली. मात्र, भाषणाच्या शेवटी अजित पवार यांनी खेड तालुक्यासाठी केलेल्या कामांचा उल्लेख करताच त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि ते भरसभेत भावूक झाले.
दिलीप मोहितेपाटील यावेळी बोलताना म्हणाले, आज गावागावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून आम्ही 'जलजीवन मिशन'च्या माध्यमातून योजना केल्या. पण, त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होत नाहीये. या सगळ्या 'जलजीवन मिशन'ची कॉन्ट्रॅक्ट्स ही मंत्रालयामधून त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं. ज्याला कुठलाही अनुभव नाही, अशा माणसाला २० ते २५ योजना दिल्या गेल्या. त्या कॉन्ट्रॅक्टरला अनुभव नाही त्यामुळे जलजीवनचं काम होत नाही.
तसेच रस्त्याची कामं सुरू केली त्याचे पैसे मिळत नाहीत. या सगळ्या गोष्टींमध्ये जर लक्ष आपण घातलं नाही, तर फार मोठा असंतोष लोकांच्या मनामध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद राज्य शासन यांनी या मध्ये मार्ग काढावा, एवढीच वहिनी साहेबांना माझी विनंती राहणार आहे. कारण आम्ही दादांकडे गेलो, दादा एका क्षणामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी मिळायच्या... अडचण संपून क्षणामध्ये त्याच्यावर निर्णय व्हायचा. अशाच पद्धतीच्या निर्णयाची आपल्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे.
मला खात्री आहे, की हळूहळू वहिनी साहेबांना सुद्धा बऱ्याच गोष्टी आता काळायला लागल्या आहेत. जशा जशा त्या ग्रामीण भागामध्ये फिरतील किंवा जशा अडचणी समोर येतील, त्यातनं मार्ग काढून लोकांना न्याय द्यायचं काम वहिनी साहेब करतील, ही खात्री आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि या तालुक्यावर अजित दादांचं अनंत उपकार आहेत... एवढंच बोलतो, असं म्हणून मोहिते पाटील यांना उनका अनावर झाला आणि त्यांनी भाषण उरकत घेतलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.