Ajit Pawar| Pune News|
Ajit Pawar| Pune News| 
पुणे

Ajit Pawar| अजित पवारांनी थेट सुरक्षा रक्षकाकडूनच घेतले पैसे...

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी गणपतीची आरती केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.

पण याचवेळी एक मजेशीर गोष्ट इथे घडली. अजित पवार गणपतीच्या दर्शनासाठी येत असताना मंदिरात आल्यावर त्यांनी त्यांचे खिसे चाचपले, पण त्यांच्या खिशात पैसेच नव्हते. बाप्पाच्या दर्शनासाठी येत असताना ते पैसेच विसरले होते. ऐनवेळी त्यांनी आपल्या सुरक्षारक्षकाकडून पैसे घेतले आणि गणपतीची पुजा केली. सुरक्षारक्षकाकडून पैसे घेतानाचा त्यांच्या हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

बाप्पाच्या आरतीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, आमचे महाविकास आघाडीचे सरकार असते तर हाच निर्बंधमुक्त उत्सव साजरे करण्याचा निर्णय झाला असता. यावेळी त्यांना बाप्पाकडे काय मागितलं असं विचारलं असता ते म्हणाले की,बाप्पाकडे काही मागितलं नाही. भक्तीभावानं बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी इथे आलोय. प्रत्येकवेळी बाप्पाकडं मागितलंच पाहिजे असे नाही. मनमोकळेपणाने देवाच्या दर्शनाला जावं, उगाच सारखेचं साकडं घालून देवाला कशाला अडचणीत आणायचे, अशी मिश्लिक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतही अजित पवार (Ajit Pawar) हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांना काळजी घेण्याचे आवाहन केले. "सगळ्या गणेश भक्तांनी काळजी घ्यावी की कुठला ही अनुचित प्रकार घडू नये. पोलिस त्यांचे काम करतीलच पण गणेश मंडळांनी देखील काळजी घ्यायला हवी," असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, "३१ तारखेला बाप्पा आपल्याकडे आले आजपर्यंत सगळे कार्यक्रम चांगले पार पडले आहेत. आज दोन वर्षांनतर विसर्जन मिरवणूक निघते आहे. अतिशय आनंदाने उत्साहाने हा उत्सव पार पडला आहे. गणेशोत्सवात बारामती मतदार संघात अनेक भाजपच्या नेत्यांनी भेटी दिल्या. यावरुन अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "बारामतीत किती जण आले, किती जण गेले, खूप लाटा मी बारामतीत पाहिल्या आहेत. बारामती मधल्या लोकांना माहिती आहे की कुठले बटन दाबायचे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT