Ajit Pawar  sarkarnama
पुणे

Ajit Pawar Visit Suraj Chavan House : अजितदादा शब्दाचा पक्का! थेट पोहोचले झापुक झुपुकच्या घरी; म्हणाले, 'लोकांना माहितीये मी...'

Ajit Pawar Pays Surprise Visit to Suraj Chavan’s Home Site : अजित पवार म्हणाले, मी दिलेला शब्द पाळत आहे. लोकांना माहिती आहे की मी शब्दाचा पक्का आहे. त्या पद्धतीने सुरजला दिलेला शब्द पाळतोय.

Sudesh Mitkar

Ajit Pawar News : झापुक झुपुक नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडियावर रिल स्टार सुरज चव्हाण बिग बाॅसचा विजया ठरला. त्यानंतर तो महाराष्ट्रभर चर्चेत आला. सूरजला घरी बांधण्याची इच्छा होती त्यावेळी त्याला घर बांधून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होत. अजित पवारांनी दिलेले आश्वासन आता पूर्णत्वास येत असून याबाबतचा आढावा घेण्यासाठी आज (रविवारी) अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराला भेट दिली. यावेळी लोकांना माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे आणि तो शब्द पूर्ण करतोय, असे अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विविध विकास कामांना भेटी आणि उद्घाटन करणार आहेत . दौऱ्या दरम्यान अजित पवारांनी आपली वाट वाकडी करत सुरज चव्हाण यांच्या घराचे चाललेल्या बांधकामाचा आढावा घेतला. तसेच घराचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या आणि दिवाळीपूर्वी घराचे संपूर्ण काम पूर्ण करण्यास देखील सांगितला आहे. तसेच सुरज चव्हाणच्या येणाऱ्या चित्रपटाला शुभेच्छा देखील दिल्या.

यावेळी अजित पवार म्हणाले, मी दिलेला शब्द पाळत आहे. लोकांना माहिती आहे की मी शब्दाचा पक्का आहे. त्या पद्धतीने सुरजला दिलेला शब्द पाळतोय. आज बारामती दौऱ्यावर असताना पाणीपुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी याच गावामध्ये आलो होतो. त्यामुळे जाता जाता सुरज च्या घराचं काम कुठपर्यंत आले ते पाहता आलं.

परवा दिवशी सुरज भेटला होता तेव्हा त्याने घराचं काम सुरू असल्याचे सांगितलं होतं. पुढील महिनाभरामध्ये कंट्रक्शनचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे दिवाळीच्या आधी सर्व काम पूर्ण करण्याची प्रयत्न असल्याचा देखील यावेळी अजित पवारांनी सांगितले.

सुरज चव्हाण चित्रपट येत आहे. त्यानिमित्ताने परवाच तो पिंपरी चिंचवड येथे मला भेटला होता. एका गरीब कुटुंबामध्ये आणि जिरायती भागांमध्ये जन्माला आलेला हा मुलगा प्रगती करत आहे. प्रत्येकाच्यामध्ये काहीतरी कला गुण असतात आणि त्या कलागुणांना वाव मिळाला तर तो कुठपर्यंत पोहोचू शकतो याचे उदाहरण सुरज चव्हाण मध्ये पाहता येईल. त्याचा चित्रपट येत आहे त्या चित्रपटाला प्रेक्षक कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल. मात्र तो प्रयत्न करत आहेत त्याला शुभेच्छा असं अजित पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT