Shivsena UBT : आश्वासनांवर आश्वासने! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला मुहूर्त लागेना; पुण्यातील शाखाप्रमुखची प्रतीक्षा काही संपेना

Pune Shivsena UBT : उद्धव ठाकरे पुण्यातील शाखाप्रमुखांची भेट घेणार अशी घोषणा दोन महिन्यापूर्वी झाली होती. मात्र अद्याप साहेब भेटीला न आल्याने ठाकरेंचे शाखाप्रमुखांकडून नाराजी व्यक्त केली जातेय.
vasant more And uddhav thackeray
vasant more And uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुणे दौरावर येणार असल्याच्या चर्चा आहे. ते या दौऱ्या दरम्यान शाखाप्रमुखांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतची घोषणा पुण्यातील ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी केली होती.

मात्र आता उद्धव ठाकरे नेमके कधी येणार याबाबत आश्वासनांवर आश्वासन दिली जात आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचे दोन मुहूर्त सांगण्यात आले. मात्र दौऱ्याला मुहूर्त काही लागला नाही. उद्धव ठाकरे पुण्यातील शाखाप्रमुखांची भेट घेणार या घोषणेला दोन महिने उलटल्यानंतर देखील अद्याप साहेब भेटीला न आल्याने ठाकरेंचे शाखाप्रमुख नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या वाट्याला अपयश आल्यानंतर पुण्यात ठाकरे गटाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. सुरुवातीला ठाकरे गटातील पाच माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. या धक्क्यापासून सावरतो ना सावरतो तोच ठाकरे गटातील शाखाप्रमुख विभाग प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पुण्यातील काही आणखी पदाधिकारी शिंदेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याचे देखील सांगितलं जात आहे.

vasant more And uddhav thackeray
Sanjay Raut : पुरंदरचे आमदार असो वा मुनगंटीवार...; महायुतीत नाराजीनाट्य अन् राऊतांनी अचूक टायमिंग साधलं

अशाप्रकारे पुण्यातून ठाकरे सेनेला धक्क्यावर धक्के मिळत असताना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुण्यातील शाखा प्रमुखांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे आणि ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची दोन महिन्यापूर्वी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ठाकरे साहेब लवकरच पुणे दौऱ्यावर येणार असून शाखाप्रमुखांना भेटतील असं जाहीर केला होती.

त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं कधी भेटणार याबाबत शाखाप्रमुखांमध्ये उत्सुकता आहे. पूर्वी उद्धव ठाकरे 28 फेब्रुवारी दरम्यान पुणे दौऱ्यावर येतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र तो मुहूर्त हुकला त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे येतील अशी माहिती शाखाप्रमुख देण्यात आली होती.

मात्र आता मार्च महिना ही संपला असून फेब्रुवारीतील दोन आठवडे झाले आहेत. तरी देखील अद्याप वरिष्ठांकडून ठाकरेंच्या दौऱ्याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने शहरातील सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज असल्याचं बोललं जात आहे.

vasant more And uddhav thackeray
Shivsena UBT : पोस्टर फाडले उद्धव ठाकरेंचे; पण सोलापूर उपशहरप्रमुखावर गुन्हा दाखल झाला ‘या’ कारणांमुळे

शहरातील वरिष्ठांकडे ठाकरेंच्या दौरा बाबत विचारणा केली असता साहेब नक्की येणार आहेत. दौरा ठरला की आपल्याला कळविण्यात येईल अशी उत्तर पदाधिकाऱ्यांना दिली जात आहे. त्यामुळे ठाकरे साहेब भेटायला येणार होतात विसरलात काय अशीच काहीशी भावना शहरातील शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com