Ajit Pawar during the inauguration event, where he waited 15 minutes and addressed  sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : ...अन् अजितदादांनी आता 15 मिनिटं थांबून मगच केलं उद्घाटन; मेधाताईंच्या नाराजीचा 'तो' प्रसंगही सांगितला!

Ajit Pawar waits 15 minutes for inauguration : जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत आणि घडलं? ; आमदार शरद सोनवणेंच्या नाराजीचीही घेतली दखल

Sudesh Mitkar

Ajit Pawar inaugurated the Narayangaon Police Station building : परशुराम आर्थिक महामंडळाच्या पुण्यातील नव्या इमारतीचे उद्घाटन 1 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झालं. या उद्घाटन कार्यक्रमाची वेळ ही साडेसहाची होती. मात्र त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन उरकलं असल्याची नाराजी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली होती. त्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा या इमारतीचं उद्घाटन मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थित केलं.

आज(शनिवार) देखील एका उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेळेच्या आधी पोहचले, मात्र यावेळी त्यांनी पूर्वी घडलेल्या या प्रसंगाचे स्मरण ठेवत दादा पंधरा मिनिटे वेटींगवरच थांबणेे पसंत केल्याचे दिसले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज नारायणगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, ''मी आज नारायणगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी लवकर आलो. पण मी नऊ वाजेपर्यंत थांबलो कारण पत्रिकेत नऊच टाइमिंग होत. तोपर्यंत इमारतच काम बघितलं. मला उद्घाटनापूर्वी इमारतीचं काम कस करण्यात आलं आहे, ते बघायला आवडते. मात्र इमारतीचे काम पाहत असताना मला काही गोष्टी खटकल्या तर मी त्या सांगितल्या आहेत. हे माझं घरचं काम नाही, शेवटी जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे ही माफक अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची असते.''

अजित पवार पुढे म्हणाले, आज मी नऊ वाजता बरोबर उद्घाटन केलं. उद्घाटनाच्या ठिकाणी मी लवकर पोचहलो असताना देखील थांबलो. १ मे रोजी झेंडावंदन होतं आणि झेंडावंदन करून मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिसिव्ह करायला जायचे होते. आम्हाला झेंडावंदन करून मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री, राज्यापाल या सगळ्यांना प्रोटोकॉल प्रमाणे जावं लागतं.

मात्र त्या दिवशी एकानी मला उद्घाटनाला भेट द्या म्हणून विनंती केली. त्याला मी सकाळची साडेसहाची वेळ दिली. पण दुर्दैवाने मी तिथं सव्वासहाला गेलो तर कोणी येणार नाही म्हणून उद्घाटन करून घेतलं. तर आमच्या एक भगिनी खासदार आहेत त्या नाराज झाल्या. उद्घाटनाची वेळ साडेसहा सांगितलं आणि 6 :20 ला का उद्घाटन केले म्हणून त्यांनी विचारणा केल्यानंतर आम्ही चूक दुरुस्त केली आणि पुन्हा उद्घाटन केलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

तसेच, आज लवकर आलो तरी थांबलो पत्रिका मागवली तर त्यात नऊ वाजेची वेळ होती. म्हणून नऊ वाजेपर्यंत आपण थांबलो. मात्र आता इथले आमदार शरद सोनवणे येऊ शकले नाही. त्यांनी मला फोन केला होता मी नाराज आहे . मला विश्वासात घेतले जात नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ते तालुक्याचे आमदार आहेत त्यांना बोलावलं पाहिजे त्यांना निमंत्रण दिले पाहिजे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असंही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यांचीच नाव टाकत जा म्हणजे नाराजीचा प्रश्न उद्भवणार नाही. एव्हाना पुढच्या वेळेस सगळी मतदार यादी टाकता येईल का, ते पाहून तीही जोडा कोणीच नाराज नको, असा मिश्किल सल्लाही अजित पवारांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT