Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : अजितदादा भोसरीकडे विशेष लक्ष देणार; अजित गव्हाणेंना सूचक इशारा

Sunil Balasaheb Dhumal

Pimpri Chinchwad Politics : महायुतीत भोसरी विधानसभा भाजपकडे असल्याने अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी तुतारी हातात घेतली. त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी भोसरीकडे विशेष लक्ष द्या, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. यातून पवारांनी अप्रत्यक्षपणे गव्हाणेंना इशारा दिला.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र दोन्ही गटातील ज्याचा आमदार त्याची जागा या उमेदवारीच्या निकषाने अनेकांची झोप उडाली आहे. तसेच लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर महायुतीत चलबिचल सुरू झाल्याचे दिसते.

आमदार होण्यासाठी पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आपल्या समर्थकांसह शरद पवार Sharad Pawar गटात दाखल झाले. त्यावर अजितदादा म्हणाले, अजित गव्हाणेंनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला अन तो गेला. आता त्याचे त्याला लखलाभ! पण आपल्या पक्षात असणारे अन तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांना समजून सांगा, असा समजुतीचा सूरही अजितदादांनी यावेळी काढला.

काही जण स्वार्थासाठी इकडे-तिकडे गेले, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मला म्हणतात आता ही विधानसभा भाजपला सुटणार, मग मी कसा आमदार होणार? असं म्हणणाऱ्यांचा विचार करू नका. दिवसा एकीकडे, दुपारी दुसरीकडे आणि संध्याकाळी तिसरीकडे असे करू नका. भोसरीमध्ये विशेष लक्ष द्या, असेही पवार म्हणाले.

अर्थमंत्री पवारांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा केली आहे. यावर ते म्हणाले, काही शैक्षणिक संस्था सरकारच्या योजनांमध्ये अडसर आणत आहेत. त्यांना सरकारवर विश्वास नाही का? त्यांनी पेशन्स दाखवायला हवेत. मला आणखी बोलायला लावू नका. सरकारने संस्थांना सरळ करायचे ठरवले तर वेळ लागेल का? असा दमच अजितदादांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT