Amit Shah Vs Sharad Pawar : मराठा आरक्षणावरून अमित शहांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले...

Pune BJP Chintan Meeting : राज्यातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम भाजपने केले आहे. तर विरोधकांनी आतापर्यंत खोटे पसरवले.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : लोकसभा निवडणुकीत खोटे बोलून महाविकास आघाडीने मते घेतली. आता राज्यात विधानसभा निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार वेगवेगळे भ्रम निर्माण करत आहेत. त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उत्तर देतात.

मात्र दिल्लीतून माझे एक निरीक्षण आहे, की राज्यात भाजप सरकार येते त्यावेळी मराठा आरक्षण मिळते. तर शरद पवारांचे सरकार येते त्यावेळी मराठा आरक्षण गायब होते, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.

पुणे येथे भाजप पदाधिकाऱ्यांचा चिंतन बैठकीत अमित शहांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर जोरदार टीक केली. ते म्हणाले, 2014 मध्ये मराठा आरक्षण मिळाले त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. त्यावेळी देवेंद्र पडणवीस मुख्यमंत्री होते.

मध्यंतरी शरद पवारांचे सरकार आले आणि मराठा आरक्षण गायब झाले. आता आपले सरकार आहे, तर राज्यात मराठा आरक्षणासाठी हालचाली सुरू आहेत. आता शरद पवारांचे सरकारे आले तर पुन्हा आरक्षण गायब होणार, असेही शाह म्हणाले.

Amit Shah
Amit Shah : महायुतीत मुख्यमंत्रीपद भाजपकडे! अमित शाह यांचे सूचक विधान

राज्यातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम भाजपने केले आहे. तर विरोधकांनी आतापर्यंत खोटे पसरवले. आता त्यांनी दुधाच्या पावडरबाबत जुने नोटिफेकशन फिरवण्यास सुरूवात केली. त्याची माहिती घेतली तर समजले की ते शरद पवारांच्या सरकारचा निर्णय आहे.

ते आता सांगतात की दुधाची पावडर आयात केली जाणार आहे. मात्र दहा वर्षांत आम्ही दुधाची पावडर आयात केलेली नाही. तसेच पुढील पाच वर्षांत एक ग्रॅमही दुधाची पावडर आयात होणार नाही, असा शब्दही शाह यांनी दिला.

विरोधक राज्यात भ्रम पसरवून निवडणूक जिंकू पाहात आहेत. ते लोक आता भ्रष्टाचाराची भाषा करतात. देशात भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार कोण असतील तर ते शरद पवार आहेत. हे मी विचार करून बोलत असून त्याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही, असा हल्लाबोलही अमित शहांनी केला.

Amit Shah
Video Devendra Fadnavis : अजितदादांसोबत युती का केली? फडणवीसांनी सांगितली शिवरायांची नीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com