Ajit Pawar, Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe News : दादा, शेतमालाला हमीभाव कधी मिळणार ? अमोल कोल्हेंचा सवाल

Sudesh Mitkar

Pune News : समोरच्या उमेदवाराला पराभव दिसायला लागला की, दबाव तंत्र वापरले जात, पण सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. वैयक्तिक टिका करण्याऐवजी देशातील महागाई कमी होणार का, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का ? असे सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले आहेत.

महाविकास आघाडीचे (MVA) शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारार्थ रविवारी पुण्यातील हडपसर मतदारसंघात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर (Balasaheb Shivrkar), योगेश ससाणे उपस्थित होते. (Amol Kolhe News)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर असून शिरूर, बारामती, पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ते सभा घेत मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहेत. याबाबत अमोल कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की आज सर्वसामान्य जनता ही इंडिया आघाडीच्या मागे उभी आहे. आज देशाच्या पंतप्रधानांना येथे यावे लागत आहे. यातच इंडिया आघाडीचा विजय असल्याचे यावेळी कोल्हे यांनी म्हटल आहे.

दमदाटीला सर्वसामान्य जनता उत्तर देईल

वारंवार निधीबाबत जे सांगितल जात आहे. ते वक्तव्य पाहता सर्वसामान्य नागरिकांच्या करातील हा पैसा असून निधी हा कोणाच्याही मालकीचा नाही. विरोधकांकडून होत असलेल्या, दमदाटीबद्दल कोल्हे म्हणाले की, अश्या दमदाटीला सर्वसामान्य जनता या माध्यमातून उत्तर देणार आहे. निवडणूक हातातून निसटते तेव्हा अश्या पद्धतीने दमदाटी केली जाते, असे यावेळी कोल्हे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वसामान्य जनतेने याचा विचार करावा, जनतेच्या कर रूपाचा पैसा हा लोकप्रतिनिधी विकासासाठी वापरत असतो जर आपल्या विचाराचा उमेदवार नाही म्हणून निधी नाही, असे जर असेल तर ते लोकशाही प्रणालीला घातक असल्याचे यावेळी कोल्हे म्हणाले.

अजित पवार यांना पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीच बारामतीत अडकावे लागत आहे, याप्रश्नावर कोल्हे म्हणाले, याबाबत कोल्हे एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाला जर चार जागांवर समाधान मानावे लागत असेल तर ही परिस्थिती काय आहे हे आपण समजावे. त्यातही एक स्वतःच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी द्यावी लागते तर एक पत्नींना उमेदवारी द्यावी लागते आणि दोन उमेदवार हे बाहेरून आयात करावे लागले आहेत. आत्ता यातच काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहीत आहे, असा टोला यावेळी कोल्हे यांनी अजित पवार यांना लगावला.

SCROLL FOR NEXT