Ajit Pawar, Dy. C. M. Sarkarnama
पुणे

अजित पवार ट्रेनिंगसाठी लिहीणार देवेंद्र फडणवीसांना पत्र...

Ajit Pawar |Devendra Fadanvis| देवेंद्र फडणवीसांनी सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदाची जाबबदारी आहे

सरकारनामा ब्युरो

पुणे : गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडून पालकमंत्री (Guardian Minister) जाहीर करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तर सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले. त्यावरुन अजित पवार यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना टोला लगावला आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आपण फडणवीसांकडून प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याची मिश्लिक टिप्पणी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदाची जाबबदारी आहे. पण मी पुण्याचा पालकमंत्री असताना वेळ देताना नाकीनऊ येत होते. फडणवीसांकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत. ते कसं पेलवणार आहेत. काय होणार आहे, मला माहिती नाही. पण त्यांना शुभेच्छा, अशा शब्दांत पालकमंत्री नेमणुकीबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केल होतं.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, दादांना ट्रेनिंग हवं असेल तर त्यांना मी ट्रेनिंग द्यायला तयार आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी फडणवीसांना पत्र लिहीणार आहे, की मी तुमच्याकडे प्रशिक्षणाला कधी येऊ, त्यासाठी काही फी लागणार आहे की मोफत ट्रेनिंग देणार त्यासाठी मीही त्यांच्याशी हितगुज करणार आहे. त्यांचं ट्रेनिंग घेतो... असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

तसेच पीएफआयवर बोलताना ते म्हणाले की, देशात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर सक्त कारवाई झाली पाहिजे. भारतात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देण्याचा कोणालाही अधिकार नाही. जर तसं झालं असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई व्हायला पाहिजे की पुन्हा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे अशा घोषणा देण्याची. पण राज्य सरकार केवळ आमचा तपास सुरु आहे, असं म्हणत आहे. पण तपासाला इतका वेळ लावायची काहीच गरज नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT