Dasara Melava : शिंदे गटाच्या पोस्टरवरुन सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Dasara Melava : व्यावसायिक लोकांचे आणि निष्ठा या शब्दाचं नात असणाऱ्याचे काही कारण नाही,"
Dasara Melava news update
Dasara Melava news updatesarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवसेना काबीज करण्यासाठी शिंदे गट (eknath shinde) प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसीच्या मैदानावर (Dasara Melava) दसरा मेळावा होणार आहे. त्या मेळाव्याचं पोस्टरही नुकतचं झळकलं आहे. या पोस्टरवरुन शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला हाणला आहे. (Dasara Melava news update)

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर करुन मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली आहे. सध्या या व्हिडिओची समाज माध्यमावर चर्चा रंगली आहे. त्या आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात,"नवे मुख्यमंत्री दिघे भक्त झाले, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने त्यांचा टिझर बघितला, एक पक्ष, एक विचार, एकलव्य, एकनाथ, सगळं कस छान जमून आले आहे, फक्त 'एकनिष्ठ' हा महत्वाचा शब्द तेवढा गायब आहे, व्यावसायिक लोकांचे आणि निष्ठा या शब्दाचं नात असणाऱ्याचे काही कारण नाही,"

Dasara Melava news update
Jayant Patil : राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू ; नोव्हेंबरमध्ये शिर्डीत रणनीती आखणार

"आम्हाला त्यावर फार भाष्यही करायचे नाही, कारण तुमच्याकडे वातानुकूलित बस, पन्नास खोक्यातून सोडलेल्या ट्रेन, पंचतारांकित हॉटेलातील जेवण अशा सुविधा असतील, पण बाळासाहेब ठाकरे यांना जो शिवसैनिक वंदनीय मानतो, तो पायी चालेल, शिवतीर्थीपर्यंत पायी चालेल. हा मेळावा, गद्यारी विरुद्ध खुद्यारी दाखविणाऱ्या शिवसैनिकांचा ऐतिहासिक मेळावा असेल,ज्याची साक्ष उभा महाराष्ट्र देईन," असे अंधारे म्हणाल्या.

ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार आहे, तर शिंदे गटाने बीकेसी मैदानावर मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचाही शिंदे गटाचा मानस आहे. यासाठी राज्याच्या विविध भागांमधून कार्यकर्ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी चार चाकी गाड्यांचे बुकिंग केले जात आहे. याशिवाय एसटी बसेसचेही ग्रुप बुकिंग करण्यासाठी आमदार, पदाधिकारी सज्ज झाले आहेत. चार हजारांहून अधिक एसटी गाड्यांचे बुकिंग करण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदेच्या टिझरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा असं पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. तसंच हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार असंही म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण आणि शिवसेनेचा वाघ हे देखील पोस्टरवर आहेत. तसंच एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे. आम्ही विचारांचे वारसदार असंही या पोस्टरवर म्हटलं गेलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com