Ajit Pawar in Baramati Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Baramati Rally : ...तरच लाडकी बहीण योजना सुरू राहील; अजितदादांचा इशारा

Ladki Bahin Yojana : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या मतांवर डोळा ठेवून राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभेत पडलेले भगदाड विधानसभा निवडणुकीत भरून काढण्यासाठी महायुती सरकारने चांगलीच कंबर कसली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्याचाच एक भाग असल्याची टीका होत आहे.

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात पुन्हा महायुती सरकार आले तरच लाडकी बहीण योजना सुरू राहील असे स्पष्ट केले. यातून त्यांनी योजना आणि विधानसभेचे कनेक्शन जोडून निवडणुकीत अप्रत्यक्षपणे महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या मतांवर डोळा ठेवून राज्यात लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana सुरू केल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसेच तिजोरीत खडखडाट असताना या सरकारने योजनांचा पाऊस पाडल्याचा आरोपही होत आहे. यामुळेच राज्यात सत्ताबदल झाला तर लाडकी बहीण योजना बंद होण्याची भीती अजितदादांनी बारामतीतील जनसन्मान रॅलीतून व्यक्त केली.

अजित पवार Ajit Pawar म्हणाले, अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार आहे. या माध्यमातून महिलांच्या खात्यावर दरवर्षी 18 हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेसाठी सरकारने 46 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. मात्र राज्यात महायुतीचे पुन्हा सरकार आले तरच ही योजना सुरू राहील, असे अजितदादांनी स्पष्टच सांगून विरोधकांवर एक प्रकारे कुरघोडी केली.

दरम्यान, बारामतीत अजित पवार, ज्येष्ठन नेते शरद पवारांवर काय बोलणार याची उत्सुकता होती. मात्र त्यांनी कुणावरही एकही शब्द काढला नाही. दादा हा शब्दाचा पक्का असून दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याची ग्वाही दिली. तसेच आता काही हौसे, नवसे, गवसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवून नका, असा टोलाही त्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT