Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात काल (१० जून) पक्षाच्या कार्यकारी अध्यधपदांची घोषणा केली. खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. पवारांच्या या घोषणेनंतर मात्र अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.
अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. त्यातच पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादीने पक्ष कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजित केले होते, या कार्यक्रमाकडे अजित पवारांनी पाठ फिरवल्याने, त्यांची अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली होती. (Latest Marathi News)
राष्ट्रवादी काँग्रेसचा दिल्लीतील वर्धापन दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) पुण्याकडे निघाले. पुण्यात पोहोचल्यानंतर अजितदादांनी विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी अजित पवार म्हणाले, 'कार्यक्रमात घोषणा झाल्यानंतर मी पुण्याकडे निघालो, मी समाधानी आहे. विमानतळावर पोहोचल्यावर काही जणांचे फोन आले. मी नाराज असल्याच्या बातम्या चालवण्यात आल्या. अशा बातम्या देण बंद करा. माझा उद्या एक नियोजित कार्यक्रम साताऱ्याला असल्याने, दिल्लीतून पुण्यात आलो, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.
मात्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष कार्यालयात पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमाला अजित पवार देखील उपस्थित राहणार होते. मात्र काल दिवसभर घडलेल्या घडामोडीनंतर अजित पवारांच्या नाराजीच चर्चा होत होती. त्यातच त्यांनी सायंकाळच्या पक्ष कार्यालयातील पानसुपारीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही.
दिल्लीतून पुण्यात आल्यानंतर अजित पवार माध्यमांच्या संवाध साधला, पदाधिकाऱ्यांच्या ते संपर्कात राहिले होते. मात्र सायंकाळनंतर अचानक अजित पवार 'नॉट रिचेबल' झाले. तसेच त्यांनी सायंकाळी आयोजित केलेल्या पानसुपारीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावाली नाही. रात्री आठ नंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली की, अजित पवार पानसुपारीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. यामुळे अजित पवार नाराज नाही असे त्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी त्यांच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.