CBI Raid on Anil Ramod : अनिल रामोडांचा ठरला होता रेट; भूसंपादनाच्या एक कोटीच्या मोबदल्यावर द्यावे लागत होते दहा लाख !

CBI Raid in Pune : 'सीबीआय'च्या हाती मोठं घबाड, बेहिशेबी मलमत्तेची मोजदाद सुरू
Anil Ramod
Anil RamodSarkarnama
Published on
Updated on

CBI Arrest Anil Ramod : पुण्यातील महसूल विभागतील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना लाच प्रकरणी रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई 'सीबीआय'ने केली. त्यांना आठ लाख रुपायांची लाच घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर रामोड यांच्या कार्यालयासह बाणेर (पुणे) आणि नांदेड येथील घरांवर 'सीबीआय'ने छापे टाकले. या कारवाईत 'सीबीआय'च्या हाती मोठे घबाड लागले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. (Latest Marathi news)

दरम्यान, अनिल रामोड यांनी पालखी महामर्गासाठी भूसंपादनच्या मोबदला देण्यासाठी रेटच काढल्याची माहिती मिळत आहे. अॅड. याकूब साहेबू तडवी यांनी रामोडांच्या लाचखोरीप्रकरणी तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून शुक्रवारी (ता. ९) आठ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पडकले आहे. आता अॅड. तडवी यांनी रामोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी रामोडांच्या थेट रेटबाबतच माहिती दिली.

Anil Ramod
CBI Raid on Anil Ramod : पालखी मार्गाचं भूसंपादन अनिल रामोडांच्या आलं अंगलट !

अॅड तडवी यांनी सांगितले की, "पालखी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड लवादाची भूमिका पार पाडायचे. सातारा, सोलापूर आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यातील भूसंपादनाचे अपिलवर रामोड निकाल देत होते. दरम्यान, ते भूसंपादनाचा मोबदला वाढवून द्यायाचे. तो देताना एक कोटी रुपयांचा मोबदला देण्यासाठी रामोड 10 लाख रुपयांची लाच मागत होते."

Anil Ramod
Shrikant Shinde News : क्षुल्लक बदलीवरून युतीत कुणी आव्हान देऊ नये; श्रीकांत शिंदेनी सांगितला मध्यम मार्ग

आठ लाखांची लाच घेताना अटक केल्यानंतर 'सीबीआय'ने रामोड यांच्या पुणे, नांदेड येथील निवासस्थानांवर छापे टाकले. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. यावेळी सीबीआयच्या पथकाच्या हाती मोठे घबाड लागले आहे. रामोड यांच्या या बेहिशेबी मालमत्तेची मोजदाद सुरू असल्याची माहिती आहे. या करवाईमुळे महसूल विभागासह राज्यात खळबळ उडाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com