Maval Lok Sabha Election 2024 News: राज्यातील अनेक लक्षवेधी लढतीपैकी मावळ लोकसभेची निवडणूक होती. या मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांच्यात थेट लढत होती. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन गट आमने-सामने भिडले.
शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट यासह हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाराजीमुळे चांगलाच चर्चेत होता. याच नाराजीच्या चर्चांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. कारण अजित पवार गटाने आपला प्रचार शंभर टक्के केला नसल्याची खदखद महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माध्यमांशी बोलताना श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी आपण या मतदारसंघातून अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडणून येणार असल्याचा विश्वास व्यक्त करतच राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाबाबत नाराजी व्यक्त केली. बारणे म्हणाले, राष्ट्रवादीचा तळागाळातील कार्यकर्ता काही कारणाने दुखावला गेला होता. तो काही कारणामुळे दूर गेला. तसंच या मतदारसंघातील अजित पवार गटाने माझा प्रचार शंभर टक्के केला नाही. ज्यांनी प्रचार केला नाही. तर प्रचार न करणाऱ्यांची नावे अजित पवारांकडे नावे दिली आहेत.
तसेच पवार गटाने प्रचार केला नसला तरीही माझा विजय जवळपास अडीच लाखाच्या मताधिक्याने होईल असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला. परंतु अजित पवार गटाने पूर्ण ताकदीने माझं काम केलं असतं तर विरोधी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असतं असंही ते यावेळी म्हणाले.
मावळ लोकसभा (Maval Lok Sabha) क्षेत्रात शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची कुठलीही ताकद नसल्याने आणि मागील निकाल पाहता, मतदारांचा कौल पाहता अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी माझा विजय होईल. चिंचवड आणि पनवेल विधानसभेतून मला खूप लीड मिळेल. चिंचवडमधून लाखापेक्षा जास्त तर पनवेल मधून 70 ते 80 हजाराचं लीड मिळेल असाही दावा त्यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.