Nitesh Rane News: गुलाल आमचाच! 'आमचे उमेदवार घासून नाही ठासून येतील, महायुती 45 चा आकडा गाठणार...

Maharashtra Lok Sabha Election 2024: मतदान कसे मिळवायचं हे माहीत नसेल ती व्यक्ती (संजय राऊत) मतदान कसे झाले हे सांगत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विझवून टाकली आहे...
Nitesh Rane News
Nitesh Rane NewsSarkarnama

Mahayuti News, 21 May: लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा पाचवा टप्पा संपल्यानंतर सत्ताधारी-विरोधक गुलाल आमचाच असेल, असे ठामपणे सांगत आहे. भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत 'आमचे उमेदवार घासून नाही ठासून येतील, महायुती 45 चा आकडा गाठणार,' असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.

ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत...

राज्यातील 13 जागांवर झालेल्या मतदानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग, प्रशासनावर विरोधकांवर टीका केली. 'उद्धव ठाकरे यांचा चेहरा बघितल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय हे काल दिसले.

त्यांची पत्रकार परिषद व ,संजय राऊतांचे (Sanjay Raut) रड गाऱ्हाणं बघून पुन्हा मोदी येणार हे समजलं.कालचे मतदान पाहिले तर महायुतीला जनतेनं मनापासून स्वीकारल्याचे दिसते. चार जूननंतर ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करा, ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत आहे, असा टोला राणेंनी लगावला.

Nitesh Rane News
Lok Sabha Election 2024: दक्षिणेचं द्वार कुणासाठी खुलं होणार? भाजप-काँग्रेसची दमछाक!

पाचव्या टप्यातील निवडूक प्रक्रिया संथगतीने सुरु होती. ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला जास्त मतदान होईल त्याठिकाणी सत्ताधाऱ्यांनी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. "मशालीला मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता होती, मात्र तरी देखील मतदान झाले आहे, असे राऊत म्हणाले. त्याला राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

जनतेने मशाल विझवून टाकली...

ज्यांनी आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही. मतदान कसे मिळवायचं हे माहीत नसेल ती व्यक्ती (संजय राऊत) मतदान कसे झाले हे सांगत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विझवून टाकली आहे, अशा शब्दात राणेंनी ठाकरे गट आणि राऊतावर हल्लाबोल केला. नवमतदार व महिला मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या होत्या, त्यामुळे चार जूनला गुलाल आमचाच उधळणार, असे ठामपणे नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com